एक्स्प्लोर

हिंगोलीत गाव विक्रीला काढले...! दुष्काळ, नापिकी, बेरोजगारीला गावकरी कंटाळले

शेती कोरडवाहू असल्याने आणि सतत दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. हंगामी पावसाचे चार थेंब आल्यावर कपाशी, सोयाबीन अशी पीकं घेतली जायची. मात्र गेली सलग चार वर्षे या गावाकडे पाऊस फिरकलाच नाही.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील एक गाव गावकऱ्यांनी विक्रीला काढल्याने खळबळ उडाली आहे. सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, त्यातून आलेली नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हिंगोलीमधील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्रित येत चक्क गावच विक्रीला काढले आहे. गावाच्या विक्रीसोबत सरकारकडे इच्छा मरणाची परवानगी गावकऱ्यांनी मागितल्यामुळे खळबळ उडाली आहे. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा हे 3000 हजार लोकसंख्या वस्ती असलेले गाव आहे. शेती हेच त्यांच्या एकमेव उदरनिर्वाहाचे साधन आहे. शेती कोरडवाहू असल्याने आणि सतत दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. हंगामी पावसाचे चार थेंब आल्यावर कपाशी, सोयाबीन अशी पीकं घेतली जायची. मात्र गेली सलग चार वर्षे या गावाकडे पाऊस फिरकलाच नाही. यंदाही जुलै महिना संपत आला तरी पाऊस आलेला नाही. पाण्याअभावी पेरणी केलेली पीकं सध्या करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. बँकांच्या आडमुठ्या धोरणामुळे पीककर्जापासून शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी खासगी बँकांचे, सावकाराचे कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत.  सलग तीन ते चार वर्षापासून पीक संरक्षण विमा देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हिंगोलीत गाव विक्रीला काढले...! दुष्काळ, नापिकी, बेरोजगारीला गावकरी कंटाळले यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी शेवटचा मार्ग काढून एकत्र येत ताकतोडा गाव विक्रीला काढले आहे. मागण्या मान्य करा अथवा संपूर्ण गावाला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. काय आहेत नागरिकांच्या मागण्या
  • शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी.
  • पीकविमा मिळावा.
  • हिंगोली जिल्हा केंद्रशासित घोषित करावा
  • हिंगोली जिल्ह्यात एमआयडीसी सारखे प्रकल्प राबवावे
  • गावावरील खाजगी फायनान्स कर्ज माफ करावे
 
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget