एक्स्प्लोर
पतंजलीला दिलेल्या जमिनीची सीबीआय चौकशी करा: मुत्तेमवार

नागपूर: 'नागपूरच्या मिहान प्रकल्पातली जमीन रामदेव बाबांच्या पतंजलीला विकल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करावी.' अशी मागणी विदर्भातील काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे रामदेव बाबांच्या नागपुरातील प्रकल्पाचं उद्या केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह इतर प्रमुख मंत्री उपस्थित असणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं रामदेव बाबांच्या पतंजलि फूड प्रोसेसिंग युनिटला मिहान प्रकल्पात मोडणारी शेकडो एकर जमीन विकली आहे. 25 लाख रुपये एकर या दरानं सरकारनं रामदेवबाबांना जमीन विकल्याची माहिती समोर येते आहे. या जमिनीवर पतंजलिकडून अन्न-औषध प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येणार आहे.
आणखी वाचा






















