एक्स्प्लोर

Unseasonal Rain : वादळीवारा अन् अवकाळीनं विदर्भाला पुन्हा झोडपलं; घरची पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, अनेकांचे संसार उघड्यावर

Unseasonal Rain : विदर्भात काल सायंकाळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे  (Unseasonal Rain) पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यात मोठे नुकसान झालेला आहे.

Vidarbha Weather Update बुलढाणा :  नव तपाच्या (Nautapa 2024) पहिल्याच दोन दिवसात विदर्भात (Vidarbha) विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. सध्या घडीला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तपामानाचा पारा (Temperature) 45 ते 46 अंशांच्या घरात पोहोचले आहे. त्यामुळे नव तपाचे पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी आणखी कठीण जाणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. अशातच विदर्भात काल सायंकाळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे  (Unseasonal Rain) पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यात मोठे नुकसान झालेला आहे. 

अवकाळी पावसानं पश्चिम विदर्भाला पुन्हा झोडपलं

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काल सायंकाळी अचानक चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाच्या धारा बरसल्या. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल भिजल्यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचे नुकसान झालेलं आहे. तर अनेक गावात मोठे झाडे उन्मळून पडली असल्याने विजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी नारिकांना रात्र अंधाऱ्यात काढावी लागली आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे अक्षरशः उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. 

भिंत कोसळून 6 जण जखमी

यवतमाळच्या पुसद तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. यात पुसद तालुक्यातील वसंतनगर परिसरातील निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळून 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. गणेश सुधाकर शिंदे (वय 30 वर्ष ) यांच्या घरी इमारतीचे काम सुरू होते. दरम्यान, घरा शेजारील धीरज ढोले यांच्या घरावर बांधकाम सुरू असलेली भिंत सुसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळली.

यात शिंदे यांचे टिन पत्राचे घर पूर्णतः भिंती खाली दबले. या घटनेत गणेश सुधाकर शिंदे, सरिता गणेश भोगल, सारिका अशोक चव्हाण, अजिंक्य अशोक चव्हाण, ओंकार वसंतराव मोगरेव कृष्णा गणेश भोगल हे 6 जखमी झाले. त्यानंतर या जखमींना पुसदच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सरिता गणेश भोगल हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वातावरण निवळताच नायब तहसीलदार जि.एन. कदम यांनी मंडळ अधिकारी आणि तालाठ्यासमवेत येऊन घटनेचा पंचनामा केला. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट आहे. 

वादळी वाऱ्यामुळे दीडशे घरावरील छत गेले उडून 

यवतमाळ प्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. यात अनेकांचे संसारही उघड्यावर पडले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे या परिसरात या चक्रीवादळाने मोठे थैमान घातलं आणि त्यामुळे गावातील जवळपास दीडशे घरावरील छत उडून गेल आहेत.

14 वर्षीय मुलाचा शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यू 

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, नांदुरा आणि मलकापूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस बरसला. यात शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झालं. तर विक्रीसाठी आणलेला माल मार्केटमध्ये भिजला.  सोबतच अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतूक बंद होती. तर या सर्व परिसरात गेल्या 14 तासापासून विद्युत पुरवठा बंद आहे. तर शेगाव येथे एका 14 वर्षीय मुलाचा शेतात काम करत असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024:
T20 World Cup 2024: "बाबर आझमने पॉलिटिक्स केलं, आफ्रिदीला खाली खेचण्यासाठी मोहम्मद आमिरची निवड"
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनने इतिहास रचला!
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनने इतिहास रचला!
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Zero hour Chhagan Bhujbal Samata parishad  : नाराजीच्या चर्चा आणि भुजबळांची समता परिषदDhananjay Munde : मंत्रिमंडळाचा विस्तार ते आमदारांचे राजीनामे? धनंजय मुंडे म्हणतात...Zero Hour HIt and Run : नागपूरमध्ये हिट अँड रन, दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमीZero hour Priyanka Gandhi : प्रियांका गांधी वायनाडमधून लढणार, काँग्रेसचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024:
T20 World Cup 2024: "बाबर आझमने पॉलिटिक्स केलं, आफ्रिदीला खाली खेचण्यासाठी मोहम्मद आमिरची निवड"
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनने इतिहास रचला!
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनने इतिहास रचला!
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
मतमोजणीचा वाद रंगला, आता ठाकरेंच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; रवींद वायकरांची होती तक्रार
मतमोजणीचा वाद रंगला, आता ठाकरेंच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; रवींद वायकरांची होती तक्रार
Embed widget