एक्स्प्लोर

Nagpur News : नागपुरात पावसाची जोर 'धार'! सहा तासात 217.4 मिमी पाऊस; उपराजधानी तुंबली, नेमकं कारण काय?  

Nagpur News : आज नागपूरमध्ये सहा तासात 217.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र अवघ्या काही तास कोसळलेल्या पावसाने स्मार्ट सिटीचा लौकिक धुळीला मिळाल्याचे चित्र बघायला मिळाले.

Nagpur News नागपूर : उपराजधानी नागपूरसह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना आज सकाळपासून कोसळणाऱ्य मुसळधार पावसाने (Heavy Rain) धो- धो धुतलंय. दरम्यान अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या (IMD) वतीने केले आहे. सकाळी सहा तासात एकट्या नागपूरमध्ये 217.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 5.30 ते 11.30 दरम्यान हि 217.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे नागपूर वेध शाळेने (IMD) सांगितलंय. नागपुरात (Nagpur News) सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी अजूनही सकल भागात पाणी साचून आहे.

सहा तासात 217.4 मिमी पाऊस; उपराजधानी तुंबली

नागपुरात अवघ्या काही तासांच्या पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत केलं असून नदी नाले दुतर्फा भरून ओसंडून वाहू लागले आहेत. मात्र असेच काहीसे चित्र शहरातील मुख्य रस्त्यांवर देखील आज बघायला मिळाले. शहरातील मुख्य रस्त्यांना अक्षरक्ष: नदी, नाल्याचे स्वरूप आल्याचे चित्र आहे. अशातच आता स्मार्ट सिटीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अद्यावत यंत्रणेचीही पोलखोल झाली असून महापालिकेने पावसाळ्यापूर्वी सर्व नाले स्वच्छ केल्याचा दावाही फेल ठरला आहे. तर दुसरीकडे नागपूर विमानतळाचं प्रवेशद्वार जलमय झाल्याने प्रवाशांसाठी विमानतळावर जाण्याचा व बाहेर पडण्याच्या मार्ग पोलिसांनी पूर्णपणे बंद केलाय.

एकुणात या संपूर्ण प्रकारामुळे स्मार्ट सिटीचा लौकिक धुळीला मिळाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र अवघ्या काही तासांच्या पावसाने राज्याची उपराजधानी नागपूरची अशी दैना होण्यामागील नेमकं कारण काय? शहरातील अनियोजित विकासकामे शहराच्या कोंडीचे कारण ठरतंय का? पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक माध्यमांची गळचेपी झालीय का?असे एक ना अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित केले जात आहे. उपराजधानी तुंबली त्या मागचं नेमकं कारण काय? हे आपण जाणून घेऊ. 

नागपुरात अनेक भागा पूर सदृष्य स्थिती निर्माण होण्याची कारणे काय?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या नागपुरात ठिकठिकाणी शासनाच्या विविध विभागाकडून विकास कामे केली जात आहेत. कुठे उड्डाणपूलांची निर्मिती सुरू आहे. तर कुठे सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या निर्माण कार्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाहा तर बाधित होतोच. शिवाय निर्माण कार्यासाठीच्या बांधकाम साहित्यामुळे ही पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय अनेक ठिकाणी मोठ्या रस्त्यांवरून पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या कचरा आणि वाळू, गिट्टीसारख्या बांधकाम साहित्यामुळे तुंबलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे पाण्याचा लवकर निचरा होऊ शकला नाही आणि प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आलं.

नागपुरातील आजच्या पूर सदृश्य स्थितीमध्ये नागपूरच्या मध्यवर्ती वस्त्यांऐवजी चारही बाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याचे जास्त प्रमाणात दिसून आले. नागपूरच्या चारही बाजूला अनेक अनधिकृत वस्त्या आहे. त्या ठिकाणी महापालिका किंवा नागपूर सुधार प्रण्यास दोन्हीकडून सिवर लाईन, पाणी वाहून नेण्यासाठी नाल्यांची व्यवस्था अशी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या वस्त्यांमध्ये प्रत्येक पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यावर पाणी शिरल्याच्या घटना घडतात.

दरम्यान आज नागपुरात काही वस्त्यांमध्ये मनपाच्या दुर्लक्षामुळे, नालेसफाई व्यवस्थित न केल्यामुळे, पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. तीन तासांमध्येच जवळपास 90 मिलिमीटर पाऊस झाला तर पुढे  सहा तासात 217.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी, पाण्याचा निचरा तीव्रतेने होऊ शकेल अशी यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे नागपुरात अनेक ठिकाणी पूर सदृश्य स्थिती काही वेळासाठी दिसून आली. 

इतर महत्वाच्या बातम्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tech Sector Layoff : मोठी बातमी! IT कंपन्यांमध्ये मोठी उलथापालथ, तबब्ल 1 लाख 36000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ 
Tech Sector Layoff : मोठी बातमी! IT कंपन्यांमध्ये मोठी उलथापालथ, तबब्ल 1 लाख 36000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ 
Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : लय भारी होस्टिंग, लय भारी रेटिंग! 'बिग बॉस मराठी भाऊचा धक्का'ची रेकोर्डब्रेक कामगिरी
लय भारी होस्टिंग, लय भारी रेटिंग! 'बिग बॉस मराठी भाऊचा धक्का'ची रेकोर्डब्रेक कामगिरी
Maharashtra Big Projects: महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार, 1.17 लाख कोटींच्या चार प्रकल्पांना मान्यता, कोणत्या भागात नोकऱ्या वाढणार?
महाराष्ट्रात चार मोठ्ठे प्रकल्प येणार, 1.17 लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता, कोणत्या भागात नोकऱ्या वाढणार?
Jio Cinema Merging With Disney Plus Hotstar : जिओ सिनेमा ओटीटी इंडस्ट्रीत करणार मोठा धमाका, जाणून घ्या काय झालं नेमकं?
जिओ सिनेमा ओटीटी इंडस्ट्रीत करणार मोठा धमाका, जाणून घ्या काय झालं नेमकं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Times Tower Fire : कमला मिल कम्पाऊण्डमधील टाईम्स टॉवरला आगABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 06 September 2024Lalbaugcha Raja Mumbai : लालबागच्या राजाच्या यंदाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय? मंडपातून आढावाUmesh Patil  : मुख्यमंत्र्यांचा उल्लेख राहिला तर आक्षेप घेण्यासारखं काय? : उमेश पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tech Sector Layoff : मोठी बातमी! IT कंपन्यांमध्ये मोठी उलथापालथ, तबब्ल 1 लाख 36000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ 
Tech Sector Layoff : मोठी बातमी! IT कंपन्यांमध्ये मोठी उलथापालथ, तबब्ल 1 लाख 36000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ 
Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : लय भारी होस्टिंग, लय भारी रेटिंग! 'बिग बॉस मराठी भाऊचा धक्का'ची रेकोर्डब्रेक कामगिरी
लय भारी होस्टिंग, लय भारी रेटिंग! 'बिग बॉस मराठी भाऊचा धक्का'ची रेकोर्डब्रेक कामगिरी
Maharashtra Big Projects: महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार, 1.17 लाख कोटींच्या चार प्रकल्पांना मान्यता, कोणत्या भागात नोकऱ्या वाढणार?
महाराष्ट्रात चार मोठ्ठे प्रकल्प येणार, 1.17 लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता, कोणत्या भागात नोकऱ्या वाढणार?
Jio Cinema Merging With Disney Plus Hotstar : जिओ सिनेमा ओटीटी इंडस्ट्रीत करणार मोठा धमाका, जाणून घ्या काय झालं नेमकं?
जिओ सिनेमा ओटीटी इंडस्ट्रीत करणार मोठा धमाका, जाणून घ्या काय झालं नेमकं?
Ladki Bahin Yojana : आता नवीन फॉर्म भरा, लगेच 4500 रुपये मिळवा? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana : आता नवीन फॉर्म भरा, लगेच 4500 रुपये मिळवा? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट
Anant Ambani : अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट अर्पण, किंमत किती?
अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट अर्पण, किंमत किती?
देवस्थानांच्या विकासासाठी 275 कोटी; बीड, जालना, नागपूर अन् कोल्हापूरमध्ये सुशोभीकरण
देवस्थानांच्या विकासासाठी 275 कोटी; बीड, जालना, नागपूर अन् कोल्हापूरमध्ये सुशोभीकरण
IPS Transfer : गणेशोत्सव येताच सहा IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; तेजस्वी सातपुतेंना पुण्यात मोठी जबाबदारी
गणेशोत्सव येताच सहा IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; तेजस्वी सातपुतेंना पुण्यात मोठी जबाबदारी
Embed widget