नसतं साहस जीवावर बेतलं! डोळ्यादेखत चिमुकला पुरात वाहत गेला; दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद, शोधकार्य सुरू
Chandrapur News : चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील विलम नाल्यात एक दहा वर्षाचा मुलगा डोळ्यादेखत वाहून गेल्याची घटना घडली आहे. सध्या स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोधकार्य सुरू आहे.
Chandrapur News चंद्रपूर : उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना आज सकाळपासूनच्या मुसळधार पावसाने (Rain) धो- धो धुतलंय. दरम्यान अजून देखील पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या वतीने केले आहे. असे असले तरी काही नागरिक जीवावर बेतनारे साहस करून जीव धोक्यात घालताना दिसत आहे. असाच एक प्रकार चंद्रपूरच्या (Chandrapur News) नागभीड तालुक्यातून समोर आला आहे. नागभीड तालुक्यातील विलम नाल्यात एक दहा वर्षाचा मुलगा डोळ्यादेखत वाहून गेल्याची घटना घडली आहे.
दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद, स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू
विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान चंद्रपूरला (Chandrapur) आज रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला असून कुणीही ओसंडून वाहणारे नदी, नाले, ओढे ओलांडू नये, अशा सूचना प्रशासनाने वेळोवेळी दिल्या आहेत. मात्र, असे असतानाही नको ते साहस करण्याच्या प्रयत्नात अनेक अपघाताच्या घटना घडत असल्याचे नव्याने समोर आले आहे. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील विलम नाल्यात एक 10 वर्षीय युवक वाहून गेलाय. सध्या स्थानिकांच्या मदतीने त्याचे शोधकार्य सुरू आहे. मात्र ही संपूर्ण दुर्दैवी घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एकीकडे सततच्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील नदी- नाले- ओढे दुथडी भरून वाहत आहेत.
अशातच नागभीड तालुक्यातील चिकमारा मार्गावरील विलम नाला देखील ओसंडून वाहत आहे. हा नाला पार करण्याच्या प्रयत्नात असलेला दहा वर्षाचा ऋणाल प्रमोद बावणे हा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. पुलाचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो पुराच्या पाण्यात पडला. सध्या स्थानिकांच्या मदतीने त्याचे शोधकार्य सुरू आहे. मात्र अनेकांच्या डोळ्यादेखत घडलेल्या हा घटणेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
गोंदियातील पुजारीटोला धरणाचा पाण्याचा विसर्ग वाढला, 8 दरवाजे उघडले
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोंदिया जिल्ह्यातील नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला हा धरण सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा धरण असुन तुडुंब भरला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्याकरिता धरणाचे ०८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून ६०४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आलेला आहे.
इतर महत्वाच्या बातम्य