एक्स्प्लोर

Gondia News : उपराष्ट्रपतींसह राज्यपाल उद्या गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर; मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींसह राज्यपाल उपस्थित असणार आहे.

Gondia News गोंदिया : शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या 11 फ्रेबुवारीला गोंदिया(Gondiya) भंडारा (Bhandara) जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला  उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar), राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais)  यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आदींसह इतर प्रमुख नेते उपस्थित असणार आहे.

या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गोंदिया- भंडारा क्षेत्रांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ सोहळा संपन्न होणार आहे. या सोबतच बहुप्रतिक्षित असलेल्या मेडिकल कॉलेजचा भूमिपूजन सोहळा देखील पार पडणार आहे. उपराष्ट्रपती यांच्या दौऱ्यापूर्वी गोंदिया पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला असून कार्यक्रमस्थळी दौऱ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 

प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांची जयंती दरवर्षी 9 फेब्रुवारीला साजरी करण्यात येते. मात्र काही काही कारणास्तव यंदा हीच जयंती 9 फेब्रुवारी ऐवजी 11 फेब्रुवारीला गोंदिया येथील एम. आय. ई. टी. कॉलेज, आणि  डि. बि. सायन्स कॉलेज परिसरात सकाळी 11 वाजताच्या सुमारास होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्यांसह महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांच्या निमित्याने सर्व यंत्रणा कामाला लागली असून या  कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. 

वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल 

  • 11 फेब्रुवारी 2024 ला  सकाळी 7 वाजता पासून ते संध्याकाळी 4 वाजतापर्यंत तात्पुरती स्वरूपात पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात आली आहे.
  • बालाघाटकडून रावणवाडी मार्गे आमगाव कडे जाणारी जड-अवजड वाहतुक कोरणीघाट-चंगेरा-बनाथर-छिपिया- भद्रुटोला-कटंगटोला-बडेगाव-कामठा-कालीमाटी-आमगाव मार्गे वळविण्यात आली आहे.
  • बालाघाटकडून गोंदिया ते तिरोडा कडे जाणारी जड-अवजड वाहतुक बालाघाट-खैरलांजी - परसवाडा टी पाईंट- करटी-तिरोडा या पर्यायी मार्गाने वळविली आहे.
  • आमगावकडून गोंदिया ते तिरोडा कडे जाणारी जड-अवजड वाहतुक पतंगा चौक-कारंजा-गोरेगाव-कुऱ्हाडी बोदलकसा-सुकळी-सुकळीफाटा-तिरोडा या पर्यायी मार्गाने वळविली आहे.
  • तिरोडाकडून गोंदिया ते गोरेगाव कडे जाणारी जड-अवजड वाहतुक तिरोडा-रामाणी लॉन-ढाकणी रोड-चुटीया-डव्वा टी पाईंट-गोरेगाव या पर्यायी मार्गाने वळविली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget