Vasant More : बॅनर फाटला पण...! राज ठाकरेंसोबत असलेल्या नात्यावर वसंत मोरे स्पष्टच बोलले
वसंत मोरे नव्या ट्विटमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे. ट्विटमधील व्हिडीओतून वसंत मोरेंनी पुण्यातील मनसैनिकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. वसंत मोरे आणि राज ठाकरे वेगळे होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील (Pune) फायरब्रँड नेते वसंत मोरे (vasant more) हे पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कामावर नाराज असल्याचं चित्र होतं. मात्र प्रत्येक वेळी मी मनसे सोडणार नाही. या मतावर ते खंबीर होते. आता त्यांच्या नव्या ट्वीटमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. ट्विटमधील व्हिडीओतून वसंत मोरेंनी पुण्यातील मनसैनिकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. वसंत मोरे आणि राज ठाकरे वेगळे होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
वसंत मोरेंने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी त्यांच्या आणि राज ठाकरेंचा (Raj Thackeray) जुना फोटो असलेला बॅनर बाहेर काढल्याचं दिसत आहे. त्यानंतर माझं आणि राज ठाकरे यांचं नातं कसं घट्ट आहे हे देखील या व्हिडीओतून सांगितले आहे. त्यांच्या या व्हिडीओतून त्यांनी पक्षातील विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या ट्वीटची सध्या पुण्यातील मनसेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.
ट्वीटमध्ये नेमकं काय लिहिलंय?
'मागच्या महिन्यात एका कार्यक्रमानंतर मांडववाल्याने मा. राजसाहेबांचे आणि माझे मांडवातले 2 उभे बॅनर काढले आणि एकमेकांना समोरासमोर बांधले. आज दुपारी अमितसाहेबांना भेटून आल्यानंतर म्हटलं माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्यांना उत्तर द्यावे म्हणून ते बॅनर शोधून काढले आणि म्हटलं ते ऑफिसला लावून टाकावेत म्हणजे सर्वांना उत्तरे मिळतील', असं ट्वीट करत त्यांनी विरोधाकांवर चांगलात निशाणा साधला आहे.
मागच्या महिन्यात एका कार्यक्रमानंतर मांडववाल्याने मा. राजसाहेबांचे आणि माझे मांडवातले २ उभे बॅनर काढले आणि एकमेकांना समोरासमोर बांधले. आज दुपारी अमितसाहेबांना भेटून आल्यानंतर म्हटलं माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्यांना उत्तर द्यावे म्हणून ते बॅनर शोधून काढले आणि
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) December 9, 2022
१/२#मनसे pic.twitter.com/qBNH37xjiX
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंचा कमबॅक
मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान वसंत मोरे यांना तातडीने भेटायला बोलावून घेतलं होतं. वसंत मोरे मागील काही दिवसांपासून मनसेवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. (Pune Mns) आणि त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे आणि अमित ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा होणार किंवा कोणता तोडगा निघणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र वसंत मोरेंनी ट्वीट करुन भूमिका स्पष्ट केली आहे. अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी वसंत मोरे यांना भेटीसाठी बोलवलं होते. नाराजी दूर करण्यासाठी मनविसेचे प्रमुख अमित ठाकरे मध्यस्थी करणार असल्याची शक्यता होती. यापूर्वी राज ठाकरे यांनी देखील वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही वसंत मोरे आणि स्थानिक नेत्यांमध्ये धूसफुस सुरुच होती. मनसेचे अंतर्गत वाद रोज चव्हाट्यावर येत होते. हे अंतर्गत वाद दूर करण्यासाठी अमित ठाकरेंनी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. अखेर अमित ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी मनसे सोडणार नसल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.