एक्स्प्लोर
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू
बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून दोन भाविकांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं.
औरंगाबाद : बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून दोन भाविकांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं.
बसमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील फुलम्ब्री तालुक्यातील निधोणा गावातील 35 प्रवासी होते. उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील कणप्रयागमध्ये हा अपघात झाला. बद्रीनाथाचं दर्शन घेऊन प्रवासी ऋषिकेषला निघाले होते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. एसडीआरएफ आणि पोलिसांच्या पथकही घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या जवळपास 32 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघा गंभीर जखमींना देहरादूनला नेण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement