एक्स्प्लोर

Sharad Pawar PC : लखीमपूरची घटना जालियनवाला बागेसारखी : शरद पवार

Sharad Pawar PC on Lakhimpur Kheri : उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांप्रती झालेला हिंसाचार ही केंद्र आणि उत्तर प्रदेशातील राज्य सरकारची जबाबदारी आहे, असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar PC on Lakhimpur Kheri : लखीमपूरमधील शेतकरी हल्ल्याच्या घटनेची तुलना शरद पवारांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. आज लखीमपूर हिंसाचारप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार दोन्हींवर निशाणा साधला. 

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांप्रती झालेला हिंसाचार ही केंद्रा आणि उत्तर प्रदेशातील राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. तसेच सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी करावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. तसेच मृत शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्याचीही केंद्र सरकारची मानसिकता नाही, हे सरकार संवेदनाहिन आहे, अशी टिकाही शरद पवार यांनी केली आहे. 

उत्तर प्रदेशातील हिंसाचार प्रकरणी बोलताना शरद पवार म्हणाले की, "या हिंसाचारामध्ये ज्यांचे जीव गेले त्याची जबाबदारी भाजप शासित दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारचीच पूर्णपणे आहे. मी या हिंसाचाराचा निषेध करतो. पण फक्त निषेध करून आम्हाला शांती मिळणार नाही. या प्रकरणाचा तपास आणि चौकशी केली गेली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी झालं पाहिजे. या प्रकारामुळे केंद्र सरकारची नियत काय आहे, हे दिसून येतंय. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, म्हणून ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, हे यशस्वी होणार नाही. हातात असलेल्या ताकदीचा गैरवापर केला जातोय. शेतकऱ्यांनो, भले तुमच्यावर हल्ला झाला असेल, आम्ही तुमच्या बरोबर आहोत."

"केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे संवेदनशील नाही. जालियनवाला बागमध्ये कशी परिस्थिती झाली होती, तशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे.", असंही शरद पवार म्हणाले.

कृषी कायद्यांविरोधात असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, "दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग आंदोलन करत आहे, शांतीने आंदोलन सुरु आहे, मात्र 26 जानेवारीला त्यांच्यावर हल्ला केला गेला, याच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशभर उमटल्या. लोकशाहीमध्ये शांततेनं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. लखीमपूर इथं जमलेले शेतकरीही शांततेने आंदोलन करत होते, आमच्या मागण्या मांडत होते. मात्र त्यांच्या अंगावर गाडी चढवण्यात आली. ज्यात काही जणांचा मृत्यू झाला. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget