Unseasonal Rain : अवकाळीचे ढग कायम, पुढील दोन राज्यात कुठे कोसळधारा तर कुठे रिमझिम
Unseasonal Rain : हमावान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा जास्त जोर दिसेल.
![Unseasonal Rain : अवकाळीचे ढग कायम, पुढील दोन राज्यात कुठे कोसळधारा तर कुठे रिमझिम Unseasonal Rain next tow days Rain prediction maharashtra vidharbha kokan marathi news update Unseasonal Rain : अवकाळीचे ढग कायम, पुढील दोन राज्यात कुठे कोसळधारा तर कुठे रिमझिम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/1b41aa2f23e79e0566a6f585ca1fbf1e1683204923116290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Unseasonal Rain : राज्यभरामध्ये दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून या पावसामुळे काही ठिकाणी दिलासा मिळाला तर काही ठिकाणी मोठे नुकसानही झाल्याचे पाहायला मिळतेय. त्यातच अजूनही राज्यात आज आणि उद्या दोन दिवस अवकाळीच संकट कायम राहणार आहे. दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालेय. द्राक्ष, कांदा, मिरची, केळी तसेच तुरीसारख्या पिकांचा अक्षरश: चिखल झाला. अवकाळी पाऊस आला आणि शेतकऱ्याच्या पदरात दु:खाची आणि वेदनेची पेरणी करून गेला. पण अवकाळी पावसाचे ढग पुढील दोन दिवस राज्यावर आहेत. मध्य भारतात पुढील तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. सोबतच, काही ठिकाणी धुक्यांचे चित्र देखील बघायला मिळू शकेल
हमावान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा जास्त जोर दिसेल. मात्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पाऊस पाहायला मिळेल. उद्या मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उद्या कुठेही राज्यात गारपिटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली नाही.
राज्यात पुढील दोन तीन दिवस ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. त्यानंतर राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उद्या विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज कायम असल्याने शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलंय.
शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
यंदा वरुणराजा चांगलाच रुसलाय आणि शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलंय. खरंतर, यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेत शिवारात फक्त ढेकळंच दिसू लागलीयत. आग ओकणारा सूर्य आणि उन्हाच्या झळांमुळे, मातीतून नुकतंच डोकं वर काढलेले इवले इवले कोंब करपून गेले. आणि शेतात फक्त त्यांची राख उरली. या दुष्काळाच्या फेऱ्यातही अनेक शेतकऱ्यांनी ताटातला घास कमी करत, पोटाला चिमटा घेत, उसनवाऱ्या करत आणि कर्ज घेत काळ्या आईच्या पदरात बियाण्यांची ओटी भरली. तीही पिकं जोमानं डोलारू लागली होती. दिवसभर पोटच्या लेकरासारखी या पिकांची सेवा करून शेतकरी घरी गेले. आता या पिकांच्या उत्पन्नातून कर्ज फेडता येईल, पडकं घर बांधता येईल, मुलांच्या शाळांची फी भरता येईल. आणि वयोवृद्ध आईबापाचं दवापाणी बघता येईल. अशी स्वप्न शेतकरी बघतच होता. आणि काही क्षणांतच मध्यरात्री आभाळ कोपलं. आणि त्यानं शेतकऱ्यांना जणून अवकाळीचा शापच दिला. पाऊस रात्रभर एखाद्या वैऱ्यासारखा कोसळला. छपरावर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाने शेतकरी कातावला. शेतातल्या पिकांचं काय झालं असेल. या काळजीत बुडून गेला. भल्या सकाळी उठून, गाय जशी वासराकडे धावते तसा शेतकरी शिवाराकडे धावला. शेताच्या बांधावर पाय ठेवला आणि रात्रभर पडलेल्या पावसाचं पाणी, जणू शेतकऱ्यांच्या डोळ्यांत साठलं अन् ते पापण्या ओलांडून वाहू लागलं. द्राक्ष, कांदा, मिरची, केळी तसेच तुरीसारख्या पिकांचा अक्षरश: चिखल झाला. अवकाळी पाऊस आला आणि शेतकऱ्याच्या पदरात दु:खाची आणि वेदनेची पेरणी करून गेला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)