एक्स्प्लोर
शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूपत्राचा वाद, जयदेव यांची 18 जुलैपासून उलटतपासणी
मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून सुरू असलेल्या वादात येत्या 18 जुलैपासून जयदेव ठाकरे यांची उच्च न्यायालयात उलटतपासणी होणार आहे.
न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यावर जयदेव यांची येत्या 18 जुलैपासून उलटपासणी होणार असून दैनंदिन ही सुनाणी होईल, असे न्यायालयाने जाहीर केले.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. यावर जयदेव यांनी आक्षेप घेत बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली असताना हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व मालमत्तेचा तपशील नाही, असा आरोप जयदेव यांनी केला.
त्यामुळे यावर न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. सुरूवातीला न्यायालयाने या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्याची सूचना उद्धव व जयदेव यांनी केली होती. सामोपचाराने तोडगा न निघाल्याने याची रितसर सुनावणी सुरू झाली. आतापर्यंत या वादात बाळासाहेबांचे डॉक्टर जलील परकार, अनिल परब यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement