अदानीप्रकरणात राज ठाकरेंकडून सेटलमेंटचे आरोप, उद्धव ठाकरेंचं जशास तसं उत्तर
Uddhav Thackeray On Raj Thackeray : अदानी यांचे (Adani Group) चमचे कोण आहेत, हे बघून मला वाईट वाटते असं प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज ठाकरेंना (MNS Raj Thackeray) दिले आहे.
Uddhav Thackeray On Raj Thackeray : अदानी यांचे (Adani Group) चमचे कोण आहेत, हे बघून मला वाईट वाटते असं प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज ठाकरेंना (MNS Raj Thackeray) दिले आहे. राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) धारावीतील (mumbai dharavi redevelopment project) उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर प्रश्न उपस्थित केले होते. सेटेलमेंट झाली नाही, म्हणून मोर्चा काढला जातोय का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलेय.
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर -
मला आता कळलं अदानींचे चमचे कोण आहे. आम्ही अदानीला प्रश्न विचारले, मात्र चमचे का वाजू लागले? मी धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. धारावीच्या माध्यमातून आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे निर्णय घेणार असाल, तर ते आम्ही कसे सहन करू? मोर्च्याला आम्ही माणसं चंद्रावरून आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला, असेही ठाकरे म्हणाले.
आमचे सरकार पाडले का? असा मी प्रश्न विचारला. भाजप असती तर सेटलमेंट झाली असती पण ते नव्हते. मोर्च्याला आम्ही माणसं चंद्रावरून आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला. मुंबई विकायला गेलेल्या लोकांना काही चमचे बोलत आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला.
धमकावून उद्योग गुजरातला पळवले, मोदींवर हल्लाबोल -
नरेंद्र मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, धारावीत होतेय ते योग्य नाही. मुंबईला संपवण्यासाठी हा डाव आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे मुख्यमंत्री आहात. धमकावून हे गुजरातला उद्योग नेहले जात आहेत. महाराष्ट्र हा देशाचा आधार आहे
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ?
प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी धारावीमध्ये काढण्यात येत असलेल्या मोर्चावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, "कंत्राट काढून १० महिने झाले, आज का मोर्चा काढला जातोय ? की सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला जातोय का? हे तुम्ही त्यांनाच विचारा."
रिडेव्हलपमेंटसाठी एक प्लान असतो, तो त्यांच्याकडे आहे का? हे अदांनीना विचारा.शाळा किती, ओपन स्पेस किती? सगळं माहिती पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.