एक्स्प्लोर
लोकसभेच्या आधीच विधानसभेसासाठीचा फॉर्म्युला फिक्स, उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
युतीचा निर्णय भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण घेणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई : विधानसभा निवडणकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेमध्ये युती होण्यावरुन एकमेकांवर टीका टिप्पणी होत असताना उद्धव ठाकरेंनी युतीबाबत विश्वास व्यक्त केला आहे. विधानसभेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजप-शिवसेनेची युती होणारच असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसेचं युतीबाबतचा फॉर्म्युला फिक्स झाल्याचं म्हणतं उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला.
युतीचा निर्णय भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण घेणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच विधानसभेसासाठीचा फॉर्म्युला फिक्स झाल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यामुळे इतर कुणाच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोलाही लगावला.
VIDEO | काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या हाती शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश | एबीपी माझा
युतीवरुन चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
युतीच्या जागावाटपावर 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाईल, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.
विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये जागा वाटपात एकमेकांच्या सीटिंग जागांना हात लावायचा नाही, ही भाजप आणि शिवसेना दोघांचीही मानसिकता असल्याचं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जागावाटपाबाबत बोलताना विद्यमान जागांव्यतिरिक्त चर्चा करण्याबाबत विधान केले होते. नागपूरमध्ये आता चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा यावर शिक्कामोर्तब केले आहे.
BJP and Shiv Sena Alliance | चंद्रकांतदादा 'पेन्टर', शिवसेना 'कारपेन्टर', जागावाटपाचा फॉर्म्युला राऊतांचा टोला | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement