एक्स्प्लोर

Karnataka CM Swearing In Ceremony : कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी; ममतांपाठोपाठ उद्धव ठाकरेंचीही अनुपस्थितीत

Karnataka CM Swearing In Ceremony : काँग्रेस नेते सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. परंतु या शपथविधीला उध्दव ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत. 

Karnataka CM Swearing In Ceremony : कर्नाटकात काँग्रेसच्या (Congress) विजयानंतर आज कर्नाटकात सिद्धरामय्या (Siddaramaiah) मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतील. तसेच डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधीला देशभरातील राजकीय नेते उपस्थित राहतील. परंतु ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. तर ठाकरे गटाचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित राहणार आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. 

सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून काँग्रेसकडून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वत: उद्ध ठाकरे यांना फोन करुन निमंत्रण दिलं होतं. परंतु उद्धव ठाकरे शपथविधीला हजर राहणार नसल्याचं समजलं. त्यांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 

ममता बॅनर्जी राहणार अनुपस्थित 

या शपथविधी सोहळ्यामुळे केंद्रातील सत्ताधारी पक्षाला विरोधकांची मूठ किती घट्ट आहे याचा अंदाज आला असता असं म्हटलं जात आहे. तसेच सत्ताधारी पक्षाला एक वेगळा संदेश गेला असता अशी देखील चर्चा रंगली आहे. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये सगळं आलबेल सुरु आहे ना असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

काँग्रेसकडून दिग्गजांची उपस्थिती

काँग्रेसकडून दिग्गज नेत्यांची उपस्थिती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी हे देखील या सोहळ्यासाठी कर्नाटकात असतील. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बंगळूरच्या श्री कांतीराव स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील बंगळूरमध्ये होणाऱ्या या शपथविधीसाठी रवाना झाले आहेत. 

सिद्धरामय्या दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

सिद्धरामय्या यांच्याकडे काँग्रेसकडून कर्नाटकाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. 75 वर्षीय सिद्धरामय्या हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याआधी त्यांनी 2013 कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

संबंधित बातमी

Karnataka CM : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा आज शपथविधी, उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार घेणार शपथ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग

व्हिडीओ

Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
Embed widget