एक्स्प्लोर

Karnataka CM : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा आज शपथविधी, उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार घेणार शपथ

Karnataka CM Swearing In Ceremony : काँग्रेस नेते सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

Karnataka CM Oath Ceremony : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेस नेते सिद्धरमय्या (Siddaramaiah) आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar) उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मंत्रिमंडळात सामील होणारे काही आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. शपथविधी समारंभाच्या अगोदर, सिद्धरमय्या आणि शिवकुमार नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणार्‍या मंत्र्यांची नावे आणि खात्यांच्या वितरणाबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. 

आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी

काही तासांत मुख्यमंत्री म्हणून सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसकडून विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप जवळपास एक वर्ष बाकी असल्याने 2024 च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या एकीचं प्रदर्शन म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पाहिलं जात आहे. 

सिद्धरमय्या आणि शिवकुमार राहुल आणि प्रियांका यांच्या भेटीला

सिद्धरमय्या आणि शिवकुमार यांनी शुक्रवारी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसने आपल्या अधिकृत हँडलवरून या बैठकीचे फोटो ट्विट केले आहेत. या फोटोला कॅप्शन देत लिहिलं आहे की, "कर्नाटकमधील लोकांच्या सरकारच्या शपथविधीपूर्वी एक बैठक." तसेच सिद्धरमय्या यांनी दिल्लीत काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली.

सिद्धरमय्या नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बंगळुरूच्या श्री कांतीराव स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. या स्टेडियममध्ये सिद्धरमय्या यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल थावरचंद गेहलोत दुपारी 12:30 वाजता कांतेराव स्टेडियमवर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 2013 मध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर सिद्धरमय्या आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तसेच. शिवकुमार यापूर्वी सिद्धरमय्या यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीपर्यंत कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील.

शपथविधीला दिग्गजांची उपस्थिती

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, अनेक मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. योग्य संयोजन असलेलं मंत्रिमंडळ, सर्व समुदाय, प्रदेश, गट यांचे प्रतिनिधी आणि जुन्या आणि नव्या पिढीतील आमदार यांच्यात समतोल राखणे, हे नव्या मुख्यमंत्र्यांसमोरील आव्हान असेल.

महत्वाच्या इतर बातम्या :

Karnataka CM swearing-in ceremony: कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातून कोणाकोणाला निमंत्रण? महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे, देशातून कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीसSpecial Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Embed widget