एक्स्प्लोर
Advertisement
उदयनराजे पवारांच्या भेटीला, उमेदवारीचा निर्णय गुलदस्त्यात
उदयनराजेंनी तातडीने भेटीची वेळ मागितल्यानंतर पुण्यात शरद पवारांनी त्यांची भेट घेतली.
पुणे : 'फसवाफसवी करु नका...' असा सल्ला देणारे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले. यावेळी पवारांनी उदयनराजेंना 'वेट अँड वॉच'चा सल्ला दिला.
उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये म्हणून बारामतीमध्ये सोमवारी सकाळी उदयनराजेंच्या विरोधकांनी शरद पवारांना साकडं घातलं होतं. त्यामुळे संध्याकाळी उदयनराजेंनी तातडीने पवारांकडे भेटीची वेळ मागितली. त्यानंतर पुण्यात पवारांनी उदयनराजेंची भेट घेतली.
चर्चेअंती निर्णय घेऊ असं आश्वासन यावेळी शरद पवारांनी दिलं. 'वेट अँड वॉच'च्या सल्ल्यामुळे उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
काहीच दिवसांपूर्वी उदयनराजेंनी पवारांची भेट घेतली होती. “भेट घेतली, मिठी मारली आणि सांगितलं, तुम्ही आमचेच आहेत.. पवार साहेबांविषयी काय बोलायचं.. एवढे मोठे नेते आहेत, आपल्या सगळ्यांना लाजवंल, या वयातही एवढी धावपळ करतात. काय बोलायचं त्या माणसाविषयी... ठिकंय.. म्हटलं, फसवाफसवी करु नका फक्त, नाहीतर आपल्याला पण कळतं..” असं उदयनराजे या भेटीविषयी बोलले होते.
'डीजे वाजवणारच... कोर्टाचा अवमान झाला तर मी बघून घेईन...' असं म्हणणारे खासदार उदयनराजे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कुठेच दिसले नव्हते. साताऱ्यातून डीजे आणि राजे असे दोघंही गायब झाल्याची चर्चा रंगली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement