एक्स्प्लोर
गडचिरोलीत ड्युटीस नकार, SRPF च्या दोन सहाय्यक फौजदारांना अटक
नागपूर : गडचिरोलीत निवडणूक बंदोबस्तासाठी जाण्यास नकार देणं दोघा अधिकाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. ड्युटीला नकार देणाऱ्या राज्य राखीव दलाच्या दोन सहाय्यक फौजदारांना अटक करण्यात आली आहे.
मोहनचंद पांडे आणि ओमप्रकाश लांजेवर अशी अटक झालेल्या सहाय्यक फौजदारांची नावं आहेत. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात निवडणूक बंदोबस्तासाठी या दोघांची ड्युटी लावण्यात आली होती. मात्र त्यांनी तिथे जाण्यात नकार दिला.
दोघंही एसआरपीएफच्या ग्रुप 4 चे कर्मचारी आहेत. नकार दिल्याने एसआरपीएफ कायद्याच्या कलम 147 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नागपूर एमआयडीसी पोलिसांनी या दोघांना अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement