एक्स्प्लोर
नगरमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची हत्या
अहमदनगर-पुणे मार्गावर केडगावला रस्ता रोको करण्यात आला. सेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या उपस्थितीत रस्ता रोको केला. मारेकऱ्यांना त्वरीत अटक करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं आहे. रस्ता रोकोनं वाहतूक विस्कळीत झाली असून तणावाचं वातावरण आहे. शहरात सध्या कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अहमदनगर : केडगावमध्ये राजकीय वैमनस्यातून दोघांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. गोळीबारात सेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांचा जागीच मृत्यू झाला. मारेकऱ्यांनी गोळीबार करुन कोयत्यानं ही वार केला. मृतदेह झाकले असून पोलिसांना हात लावू दिला गेला नाही.
सुवर्णनगर परिसरात भर चौकात सायंकाळी दोघांवर गोळ्या झाडल्या. संजय कोतकर आणि वसंत ठुबे सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. त्यावेळी दोघेजण गोळीबार करुन फरार झाले. या हत्याकांडानंतर जमावानं दगडफेक करुन वाहनांची मोडतोड करण्यात आली. यामुळे केडगावात तणावाचं वातावरण असून व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली आहे. पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे.
अहमदनगर-पुणे मार्गावर केडगावला रस्ता रोको करण्यात आला. सेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या उपस्थितीत रस्ता रोको केला. मारेकऱ्यांना त्वरीत अटक करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं आहे. रस्ता रोकोनं वाहतूक विस्कळीत झाली असून तणावाचं वातावरण आहे. शहरात सध्या कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, माजी महापौर संदीप कोतकर हे जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्यानं त्यांचं सदस्यत्व रिक्त झालं आहे. लॉटरी विक्रेता अशोक लांडे हत्या प्रकरणी संदीपसह तीन भाऊ आणि तत्कालीन कॉग्रेस शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. भानुदास कोतकर सध्या जामीनावर आहे.
या पोटनिवडणुकीत संदीपचा चुलत भाऊ विशाल हा कॉँग्रेसकडून विजयी झाला. त्यानं सेनेच्या विजय पटारेचा पराभव केला. या निवडणुकीपूर्वीपासून सेना आणि कॉंग्रेसमध्ये राजकीय वाद झाला होता. त्याचबरोबर शाब्दिक चकमकही झाली होती. त्यामुळे याचंच पर्यावसान हत्यात झाल्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement