एक्स्प्लोर
एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म
दरम्यान महिलेचं हे पाचवं अपत्य आहे. याआधी तिला तीन मुली आणि एक मुलगा आहे.
![एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म Two headed baby born Beed एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30101210/Beed_Two-Headed_Baby_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : बीडच्या एका महिलेने एक शरीर आणि दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला. अंबाजोगाईमधील स्वाराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिलेची काल (29 ऑक्टोबर) रात्री 8.30 च्या सुमारास प्रसुती झाली. बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहेत.
प्रसुती विभागातील सर्जन डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघड शस्त्रक्रियेद्वारे महिलेची प्रसुती केली. बाळाच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी त्याला शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. ही महिला मूळची परळी तालुक्यातील आहे.
महिलेची आधीची कागदपत्रं तपासताना बाळामध्ये दोष असल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सिझेरियनद्वारे प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. परंतु बाळाला बाहेर काढल्यानंतर त्याला दोन तोंड असल्याचं त्यांना दिसलं. महत्त्वाचं म्हणजे बाळाचं वजन 3 किलो 700 ग्रॅम असून त्याची आणि आईची प्रकृती चांगली आहे.
या बाळाला दोन डोकं, दोन किडनी आणि दोन फुफ्फुस आहेत. मात्र इतर अवयव एकच आहेत. दरम्यान महिलेचं हे पाचवं अपत्य आहे. याआधी तिला तीन मुली आणि एक मुलगा आहे.
![एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30101223/Beed_Two-Headed_Baby_2-710x1024.jpg)
एक शरीर, दोन तोंडं, सायन रुग्णालयात सयामी जुळ्यांचा जन्म
एक शरीर आणि दोन तोंड असलेल्या बाळांना सयामी जुळेच म्हणतात. मात्र यात एका बाळाची संपूर्ण वाढ झाली आहे, तर दुसऱ्या बाळाचं तोंड, छाती आणि पोटाकडचा भाग पहिल्या बाळाला जोडला गेला आहे.![एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30101251/Beed_Two-Headed_Baby_3-1024x768.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
राजकारण
भारत
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)