एक्स्प्लोर

'नाणार'नंतर शिराळ्यातील निसर्गसंपन्न जमिनीवरही गुजरातींचा डोळा

दुर्मिळ औषधी वनस्पती लागवडीच्या नावाखाली खोटे प्रकल्प दाखवून करोडो रुपयांचा गंडा घालण्याचा पियुष जोशी आणि रमेश गामी या लोकांचा हेतू असल्याचा आरोप शेतकऱ्यानी केलाय.

सांगली : कोकणातील प्रस्तावित असलेल्या नाणार प्रकल्पामध्ये परप्रांतीय लोकांनी ज्या पद्धतीने कवडीमोल दराने जमिनी घेतल्या तशाच प्रकारे मिनी कोकण म्हणून ओळख असलेल्या शिराळा तालुक्यातील काही गावातील जमिनी काही गुजराती लोकांनी विकत घेऊन त्या जमिनीवर 100 कोटींचे कर्ज  घेतल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गावातील स्थानिक दलालांना हाताशी धरुन आणि प्रशासनाकडून बोगस पंचनामे करुन या जमिनीवरती अकृषिक वापर खोटा दाखवून शेतकऱ्यांना फसवून या जमिनी घेतल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. विशेष म्हणजे या जमिनीवर गुजराती लोकांचा 100 कोटींचे कर्ज काढण्याचा हेतू आहे. त्यातील 25 कोटी कर्ज हे त्यांना मिळले असून, 75 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. शिराळा परिसर चांदोली पर्यटन झोनमध्ये येतो. सावंतवाडी, शिरसटवाडी, पाचगणी गावच्या हद्दीत येत असलेला हा अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. पण हाच निसर्गरम्य परिसर पाहून येथील शेतजमिनीवरती काही गुजराती लोकांनी डोळा ठेवत आणि या गावातील स्थानिक दलालांना हाताशी धरून या जमिनीवर भलेमोठे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या डोंगराळ भागातील जमिनी कवडीमोल दराने खरेदी करुन त्यावर बँकांना  खोटा प्रोजेक्ट उभारण्याचे दाखवून हा सर्व प्रकार केल्याचे समोर आले आहे. या शेतजमीनवरती दुर्मिळ औषधी वनस्पतीची लागवड करण्याचा प्रकल्प उभारण्याचे दाखवत या लोकांनी  100 कोटीपैकी 25 कोटीचे कर्ज मिळवले असले तरी प्रत्यक्षात या जमिनीवर एकही औषधी झाड लावले नसल्याचे समोर आले आहे. दुर्मिळ औषधी वनस्पती लागवडीच्या नावाखाली खोटे प्रकल्प दाखवून करोडो रुपयांचा गंडा घालण्याचा पियुष जोशी आणि रमेश गामी या लोकांचा हेतू असल्याचा आरोप शेतकऱ्यानी केलाय. नाणार'नंतर शिराळ्यातील निसर्गसंपन्न जमिनीवरही गुजरातींचा डोळा जोशी आणि गामी हे लोक यातील कोणत्याही गावचे रहिवासी देखील नाहीत. ग्रामपंचायतीने तसा दाखला देखील दिला नसताना या लोकांनी आपण या गावचे रहिवासी आहोत असे दाखवून या शेतकऱ्यांचा जमीनीचा खरेदी व्यवहार केला आहे. शिराळाचे तत्कालीन तहसीलदार दीपक शिंदे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन संबंधित शेतकऱ्यांना नोटीस न देता, शेतजमीनीच्या सहहिस्सेदाराची समंती न घेता ही शेती बिगरशेती केली. 125 एकर बिगरशेती जमिनीपैकी 35 एकर एक्सेल कंपनीला मॉरगेज करून यातील 25 कोटी रुपये या दोन लोकांनी उचलले आहेत. लवकरच उर्वरीत 75 कोटींचे देखील ते उचलणार आहेत. शिराळामधील या शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक वापरासाठी बिगरशेती करून यावर मॉरगेज करून कोट्यवधी रकमेची कर्ज काढण्याचा या परप्रांतीय लोकांचा डाव असल्याचा दावा मनसेच्या नेत्यांनी केलाय. जर याची प्रशासनाने योग्य दखल घेऊन संबंधितावर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आलाय. काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून रहिवाशी नसताना रहिवाशी दाखवून, खोटे पंचनामे करून शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन कायद्याची पळवाट कडून तहसीलदार यांनी शेतकाऱ्यांवर्ती अन्याय करत ही जमीन बिनशेती असल्याचे आदेश दिले .काही शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या आहेत तर काहींनी नाहीत ते सर्व सहहिस्सेदार असताना त्यांच्या सर्व क्षेत्रावर्ती सहहिस्सेदार यांची सहमती नसताना हा आदेश देण्यात आला . त्याचा परिणाम वरील व्यक्तींनी खोटा प्रोजेक्टच्या नावे 25 कोटींचे कर्ज उचलले आहे, तर 75 कोटी उचलून पसार होणार आहेत. जमिनी तारण ठेवल्याने याचा भार शेतकाऱ्यांवर आणि सहहिस्सेदार यांच्यावर पडणार आहे . यामुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget