एक्स्प्लोर
पळून जाण्याचे दोन प्रयत्न अयशस्वी, आरोपी तिसऱ्या प्रयत्नात पसार
ज्ञानेश्वर बालाजी जाधव या चोरीच्या प्रकरणात अटक असलेल्या बीड जिल्हा कारागृहातील आरोपीने रुग्णालयातून पलायन केलं.
बीड : एकदा तुरुंगातून पळून जाण्याचा आणि दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीला अखेर रुग्णालयातून पळून जाण्यात यश आलं. ज्ञानेश्वर बालाजी जाधव या चोरीच्या प्रकरणात अटक असलेल्या बीड जिल्हा कारागृहातील आरोपीने रुग्णालयातून पलायन केलं.
ज्ञानेश्वरला अंबाजोगाई येथील एका चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी बीड येथील जिल्हा कारागृहात झाली. तिथे असताना त्याने कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात उंचावरून पडल्याने त्याचे हात-पाय मोडले होते.
उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याने 24 मार्चला शौचालयाच्या खिडकीच्या काचेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्याच्यावर तिथेच उपचार सुरु होते. अखेर आज सायंकाळी ज्ञानेश्वरने संधी साधून रुग्णालयातून पलायन केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement