एक्स्प्लोर
तुकाराम मुंढेंनी जुनी फाईल उघडली, कुंभमेळ्याचं पुन्हा ऑडिट
कुंभमेळ्याच्या काळात झालेला खर्च आणि साहित्य खरेदी आवश्यक होती की अनावश्यक होती, याची चौकशी केली जाणार आहे.
नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकारम मुंढेंनी जुन्या फाईल उघडण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षापूर्वी पार पडलेल्या कुंभमेळ्याच्या खर्चाचे फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
कुंभमेळ्याच्या काळात झालेला खर्च आणि साहित्य खरेदी आवश्यक होती की अनावश्यक होती, याची चौकशी केली जाणार आहे. कुंभमेळा काळात शेकडो कोटी रुपयांचा खर्च झाल्याने त्याची तपशीलवार माहिती आयुक्तांनी मागितली आहे.
नुकत्याच चार अधिकाऱ्यांना नोटीस आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने महापालिकेत अधिकारी कर्मचारी आधीच चिंतेत असताना, कुंभमेळ्याचा जुना विषय आयुक्तांनी उकरुन काढल्याने संबंधित अधिकारी मुंढेंच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
धडाकेबाज काम करणारे आणि कडक शिस्तीच्या स्वभावाचे आयएएस अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे महाराष्ट्राला परिचित आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदानंतर त्यांची नियुक्ती पुण्यातील पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी झाली. त्यानंतर तिथून नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांची वर्णी लागली. इथेही मुंढेंनी आपल्या कामांचा धडाका सुरुच ठेवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement