एक्स्प्लोर
दोन कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची लिम्का बुकमध्ये नोंद

मुंबई: संपूर्ण राज्यात कृषिदिनाचे औचित्य साधून 1 जुलै 2016 रोजी 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. त्याला राज्यातील जनतेनेही चांगला प्रतिसाद देत राज्यात 2 कोटी 81 लक्ष 38 हजार 634 वृक्षरोपण झाले होते. आता याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली असून महाराष्ट्राच्या वनविभागाने वृक्ष लागवडीसंदर्भात नव्या विक्रमाची नोंद केली आहे. वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 1 जुलै 2016 रोजी राज्यात 12 तासात लोकसहभागातून 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला होता. यावेळी राज्यात एकूण 12 तासात 153 प्रकारच्या प्रजातींच्या रोपांची लागवड 65 हजार 674 जागांवर 6 लाख 14 हजार 482 लोकांच्या माध्यमातून तब्बल 2 कोटी 81 लक्ष 38 हजार 634 वृक्षाची लागवड झाली होती. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने केली आहे. राज्यातील वनसंपदा वाढावी यासाठी अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना मुनगंटीवार यांनी वनमहोत्सव व कृषीदिनाचे औचित्य हा संकल्प केला होता. या संकल्पपुर्तीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन जनजागृती केली होती. तसेच विविध सामाजिक संघटनांचा सहभाग लाभावा यासाठी विनंती केली. तसेच राज्यातील विविध केंद्रीय मंत्र्यांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. परिणामी राज्यात विक्रमी रोपांची विक्रमी लागवड करण्यात वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यश आले या उपक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या त्यांच्या कार्यक्रमात उल्लेख केला होता. आता याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतल्याने वनविभागात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित बातम्या वृक्षारोपणाला भरघोस प्रतिसाद, राज्यभरात 2 कोटीहून अधिक झाडं लावली ! उद्धव ठाकरेंच्या झाडाला माती घातली, रोपाचं वटवृक्ष होईल : मुख्यमंत्री वृक्षारोपणाला उत्तम प्रतिसाद, 75 लाख झाडांची लागवड
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















