Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 29 मे 2022 : रविवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. स्पाँडिलायटीस असल्याचा दावा करणाऱ्या नवनीत राणांच्या हातात गदा, काल अमरावतीत परतताच गाडीच्या टपावर बसून हनुमान चालिसा पठण, समर्थकांकडून दुग्धाभिषेक
2.वडिलांच्या भूमिकेमुळं संभाजीराजेंची अडचण, शाहू महाराजांनी भाजपचा बुरखा फाडला, राऊतांचा हल्लाबोल, तर पवार छत्रपतींचं घर फोडत असल्याचा भाजपचा आरोप
3.संजय राऊतांसाठी पंतप्रधानांना भेटणाऱ्या पवारांना नवाब मलिकांचा विसर का?, भिवंडीतल्या सभेत ओवैसींचा सवाल, मलिकांच्या सुटकेसाठी दुआ मागण्याचं आवाहन
4.भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांचं मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, मुंबईत गुन्हा दाखल, पंतप्रधानांनी कारवाई करावी, ओवेसींची मागणी
5. ओमायक्रॉनचे व्हेरियंट बीए-फोर आणि बीए-फाईव्हचे पुण्यात सात रुग्ण, तर मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा तीनशेपार
6. यंदा वह्या-पुस्तकांच्या खरेदीसाठी पालकांना जास्त खिसा रिकामा करावा लागणार, शालेय वस्तूंच्या किंमतीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ
7. 'तुमचे हे धंदे बंद करा' म्हणत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकरांचा आमदार रोहित पवारांना स्पष्ट शब्दात इशारा
8. येऊरच्या पाणी चोरांचा पर्दाफाश! धन दांडग्यांचा अतिरेक, हतबल आदिवासींचा पाण्यासाठी संघर्ष
9. शेतकऱ्यांना बोगस बियाणांपासून सावध राहण्याची गरज, नांदेडमध्ये शेकडो क्विंटल बोगस बियाणं जप्त, कृषी विभागाची मोठी कारवाई
10 . आयपीएलचा किंग होण्यासाठी गुजरात टायटन आणि राजस्थान रॉयलमध्ये मेगाफायनल, अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला
IPL 2022 Final : आयपीएलच्या 15व्या मोसमाची मेगा फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे. गुजरातच्या टायटन्सचा जल्लोष...की राजस्थानचा 'रॉयल मार्च?' यापैकी नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता जगभरातल्या तमाम आयपीएलचाहत्यांना आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या मोसमाची मेगा फायनल आणि या मेगा फायनलमध्ये हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. गुजरातचा संघ पदार्पणातच यंदाच्या मोसमातला सर्वात यशस्वी संघ ठरला. हार्दिक पंड्याचं नेतृत्व, डेव्हिड मिलरचा अनुभव, रशिद खानची जादूई फिरकी यासह संघातल्या प्रत्येक खेळाडूचं मोलाचं योगदान गुजरात टायटन्सला आयपीएलच्या फायनलमध्ये घेऊन गेलंय. गुजरातचा संघ आयपीएलच्या रणांगणात नवखा असला, तरी तो पदार्पणात सर्वात यशस्वी संघ ठरलाय. हार्दिक पंड्याच्या या फौजेनं साखळीत १४ पैकी १० सामने जिंकले. आणि मग क्वालिफायरची पायरी एकाच फटक्यात पार करुन सहजपणे फायनल गाठली. त्यामुळे फायनलमध्ये गुजरातचं पारडं जड मानलं जातंय.