Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 27 ऑक्टोबर 2022 : गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. उद्धव ठाकरेंनंतर आज आदित्य ठाकरे बांधावर, पुणे-नाशकातल्या नुकसानग्रस्तांशी संवाद साधणार, तर एकरी 50 हजाराच्या भरपाईसाठी शेतकरी संघटनांची सोशल मीडियावर मोहीम
माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज अतिवृष्टीनं नुकसान (Heavy Rain Damage) झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. नाशिक (Nashik) आणि पुणे (Pune) जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. आज दुपारी 12 वाजता ते नाशिकच्या जुन्नर तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करतील. रात्री ते पुण्यातल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.
नाशिक दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना होताना आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. आज आम्ही शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत. सरकार किती घटनाबाह्य असलं तरीही सरकारी यंत्रणेकडून मदत ही लगेच झाली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारं आमचं सरकार होतं. आता विरोधी पक्षात असलो तरी आमची जबाबदारी म्हणून आम्ही जात आहोत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर उभे राहणार आहोत. शेतकऱ्यांसोबत उभं राहणं हे गरजेचे आहे. दहीहंडी असो वा शिधा वाटपाबाबत घोषणा आणि तारखा फक्त पाहायला मिळतात. कृषीमंत्री आणि इतर मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाऊन भेट देणे गरजेचे आहे. राजकारण दूर ठेवा आणि मदत करा."
2. अयोध्या उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर आणि मुंबादेवीचा कायापालट करणार, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा, एबीपी माझावर स्पेशल रिपोर्ट
3. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून जानेवारीत महापालिका निवडणुकीचे संकेत, तर निवडणूक कधी घ्यायची हे कोर्ट आणि निवडणूक आयोग ठरवेल, फडणवीसांची माहिती
4. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या 4 आणि भाजपच्या 4 नेत्यांना संधीची शक्यता, शिरसाट, गोगावले, कडू, सरवणकर, आबिटकरांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता
5. अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव, विशेष सीबीआय कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर देशमुख मुंबई उच्च न्यायालयात, जामीन अर्जावर 11 नोव्हेंबरला सुनावणी
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 27 ऑक्टोबर 2022 : गुरुवार
6. मुंबईतल्या गिरगावमधल्या पुंगालिया हाऊसमध्ये अग्नितांडव, दोन घरं, पाच कार आणि आठ दुचाकी भस्मसात, सध्या आगीवर नियंत्रण
7. अध्यक्षपदाची कमान हाती घेताच मल्लिकार्जुन खरगेंचं मिशन गुजरात सुरु, विधानसभेसाठी सव्वाशे उमेदवारांची नावं निश्चित, 29 तारखेला खरगे मोदींच्या बालेकिल्ल्यात
8. पत्नीच्या अंगावर गाडी चढवणारे बॉलिवूड निर्माते कमल मिश्रांवर गुन्हा, 19 ऑक्टोबरची घटना सीसीटीव्ही कैद, कमल मिश्रा अजूनही मोकाट
9. पुतिन यांनी आण्विक शस्त्रांच्या चाचणीला हजेरी लावल्यानं जगाची धास्ती वाढली, जग आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांना उधाण
10. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टी-20 विश्वचषकात आज भारताचा नेदरलँडशी मुकाबला, थेट सिडनीच्या मैदानातून माझाचा रिपोर्ट