एक्स्प्लोर
तूर डाळ आता रेशन दुकानांवरही मिळणार!
ग्राहकांना आता बाजारभावापेक्षा कमी दराने तूर डाळ खरेदी करता येणार आहे.
मुंबई : आता रेशन धान्य दुकानावर तूर डाळ उपलब्ध होणार आहे. राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही तूर मोठ्या बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा कमी दराने म्हणजे 55 रुपये किलो दराने उपलब्ध होणार आहे.
गेल्या वर्षी अतिरिक्त तुरीचे उत्पादन राज्यात झालं. नाफेड बरोबर राज्याने 26 लाख क्विंटल तूर विकत घेतली. तूर विकत घेताना राज्य सरकारची चांगलीच तारांबळ उडाली होती.
26 लाख क्विंटल तूर डाळीपैकी भुसा आणि टरफलं (चुरा) यामुळे प्रत्यक्षात 17 - 18 लाख क्विंटल तूर उपलब्ध होणार आहे. यामध्ये 7 लाख क्विंटल तूर ही राज्याच्या विविध पोषण आहारातून वितरित केली जाईल. तर उर्वरित सुमारे 10 लाख क्विंटल तूर ही रेशन धान्य दुकानावर उपलब्ध होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement