एक्स्प्लोर

Todays Headline 14th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

फाळणी दिवस -
14 ऑगस्ट याच दिवशी अखंड भारताचे दोन तुकडे झाले. ही वेदना लक्षात घेऊन दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी दिन म्हणून स्मरणात ठेवला जाईल. देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी हा विशेष दिवस साजरा केला जाणार आहे.

राष्ट्रपती देशाला संबोधित करणार - 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु 76व्या स्वातंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सात वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता आकाशवाणीवरुन थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे. 

मुंबई पोलीस आयोजित आजादी की दौड मॅरेथॉन - 
मुंबई पोलीस आयोजित आजादी की दौड, ही मॅरेथॉन दौड रविवारी सकाळी 6-10 आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 

मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक 
मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी बैठक बोलवली आहे. रविवारी दुपारी 12 वाजता, सह्याद्री अतिथीगृहलर बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक,  मराठा नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

15 ऑगस्ट पूर्वी खाते वाटप होणार – सत्तार
9 ऑगस्टला शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज सहा दिवसानंतरही मंत्री पदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खाते वाटप नाही. मंत्री अब्दुल सत्तार यांनी 14 पर्यंत खाते वाटप होईल असं सांगितलं आहे. 

मालाड येथे होणाऱ्या तिरंगा यात्रेला उपमुख्यमंत्री सहभागी होणार -
मालाड येथे होणाऱ्या तिरंगा यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर सहभागी होणार आहेत. यावेळी साधारण 15,000 नागरिक सवा की.मी. चा अखंड ध्वज घेऊन सामील होणार आहेत, सकाळी 8.45 वाजता, मालाड (पश्चिम), नटराज मार्केट, शिव मंदिर येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. 

काँग्रेसकडून आझादी की गौरव यात्रा  -
काँग्रेसकडून आझादी की गौरव यात्रा काढली जाणार आहे. याला वर्षा गायकवाड, भाई जगताप आदी नेते उपस्थित रहाणार आहेत, सकाळी 10 वाजता, प्रभाकर रेस्टॉरंट येथून पुढे महात्मा ज्योतिबा फुले मार्ग, हिंदमाता,  फाळके रोड, मुंबई मराठी ग्रंथ सग्रहाल मार्गा वरून दादर स्टेशन यात्रा अशी असणार आहे.

कामाठीपुरात स्वच्छतेची स्पर्धा - 
मुंबई – मुंबईतील कामाठीपुरा आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. इथे महापालिकेच्या ई विभागाकडून एक अनोखा उपक्रम राबवला जातोय. कामाठीपुरात स्वच्छतेची स्पर्धा भरवली जातेय. ज्या महिलेचं घरं सर्वाधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी त्यांना पालिकेकडून विशेष पुरस्कारही दिला जाणार आहे.  
 
गणपती बाप्पाचे रौप्य महोत्सव  -
 मुंबई – भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आणि कला दिग्दर्शक अतुल खुळे यांच्या गणपती बाप्पाचे रौप्य महोत्सव यानिमित्त 25 गणपतींची आरास करायचा निश्चय केलाय. त्यासाठी 25 कलात्मक दृष्टी लाभलेले कलाकार त्यांच्या पध्दतीने 25 गणेश मूर्ती साकारणार, आपल्या प्रत्येकाच्या मनात एक आकार असतो. या ठिकाणी अच्युत पालव, दिग्दर्शक प्रमोद पवार इत्यादी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.  

यमुना नदी प्रवाहाबाहेर - 
मुसळधार पावसामुळे यमुना नदीला पूर येण्याची शक्यता आहे. परिसरात संततधार पाऊस कोसळत राहिल्यास यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. शनिवारी यमुना नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत होती. यमुना नदीच्या काटावर वसणाऱ्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 13 हजार पेक्षा जास्त लोकांचं आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget