भीषण पाणीटंचाई! शेतकऱ्यानं आपल्या शेतातच बसवला CCTV कॅमेरा, पाणी चोरी करणाऱ्यावर नजर
जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील ( Chhatrapati Sambhajinagar) एका शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवलीय. आपल्या शेतातील पाण्याची चोरी होऊ नये म्हणून शेतकऱ्याने चक्क CCTV कॅमेरा बसवला आहे.
Maharashtra Water Crisis : सध्या राज्यात तापमानाचा (Temperature) पारा वाढलाय. बहुतांश जिल्ह्यातील तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेलं आहे. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होतेय.शेतकऱ्यांना (Farmers) गावोगावच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. दरम्यान, या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील ( Chhatrapati Sambhajinagar) एका शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे. आपल्या शेतातील पाण्याची चोरी होऊ नये म्हणून शेतकऱ्याने शेतात चक्क CCTV कॅमेरा बसवला आहे. रामेश्वर गव्हाणे असं सिल्लोड तालुक्यातील बोदवड गावातील शेतकऱ्याचं नाव आहे.
महाराष्ट्रात पाण्याचे संकट गडद
महाराष्ट्रात पाण्याचे संकट गडद झाले आहे. पाण्याची चोरी थांबवण्यासाठी एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागातील जनता दीर्घकाळापासून दुष्काळाचा सामना करत आहे. धरण आणि तलावात पाणी नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पाण्याची चोरी रोखण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागत आहेत.
पाण्याची चोरी आणि वन्य प्राण्यांकडून मिरचीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बसवला कॅमेरा
पाणी हे किती महत्त्वाचे हे रामेश्वर गव्हाणे या शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे. रामेश्वर यांनी शेतातील पाण्याची चोरी टाळण्यासाठी आणि वन्य प्राण्यांकडून मिरचीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपल्या शेतात 360 अंशाचा कॅमेरा बसवला आहे. मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झालीय. महाराष्ट्रातील अनेक भागातील जनता दीर्घकाळापासून दुष्काळाचा सामना करत आहे. धरण व तलावात पाणी नाही, त्यामुळं शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. यंदा पाण्याची मोठी समस्या आहे. यंदा पाऊस कमी झाला आहे, यावेळी दुष्काळी परिस्थिती अत्यंत भीषण आहे, आजपर्यंत पाण्याची चोरी झाली नाही, पण पुढे काय होईल हे सांगता येत नसल्याचे रामेश्वर गव्हाणे म्हणाले. या कॅमेऱ्याचा फायदा असा आहे की, दीड एकर मिरचीच्या शेतात कोणीही पीक चोरु शकत नाही आणि या कॅमेऱ्याच्या मदतीने शेताचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचाही शोध घेता येतो. या सीसीटीव्हीच्या स्क्रिनशॉटद्वारेही नोटिफिकेशन येत असल्याचे माहिती रामेश्वर यांनी दिली.
पाणीपुरवठा करणारे तलाव नदी नाले धरणे कोरडी
महाराष्ट्रात सध्या जलसंकट गडद होताना दिसत आहे. त्यामुळं शेतीसह पण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झालाय. गतवर्षी पावसाळ्यात उशीर झाल्याने पिकांच्या पेरणीला बराच विलंब झाला होता. अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांना पिण्यासाठीही पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने बैठक घेऊन अनेक जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित केले. महाराष्ट्रातील लातूर हे दुष्काळ आणि पाणीटंचाईसाठी ओळखले जाते, जिथे एकेकाळी रेल्वेने पिण्याचे पाणी पोहोचवले जात असे. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाची पाणीपातळी यंदा मायनसवर पोहोचली आहे. त्यामुळ नागरिक चिंतेत आहेत.
पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका शेतीला
पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा शेतीला बसणार आहे. शेतीसाठी भूजलाचा सर्वाधिक वापर केला जातो. काही कृषी संस्थांच्या मते, भारतातील 90 टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. केंद्रीय जल आयोगानुसार 2000 मध्ये वापरण्यात आलेल्या एकूण पाण्यापैकी 85.3 टक्के पाणी शेतीसाठी वापरले गेले. त्यामुळे आता अनेक राज्ये कमी पाणी वापरणाऱ्या अशा पिकांवर आणि वाणांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
पुणे, सोलापूरकरांचा घसा कोरडा; उजनी धरणाने गाठली इतिहासातील सर्वात निच्चांकी पातळी