एक्स्प्लोर
हिंगोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, घरही खाक
सोनाजी आनंदराव दळवी, त्यांची पत्नी सुरेखा सोनाजी दळवी आणि मुलगी पूजा सोनाजी दळवी अशी मृतांची नावं आहेत.
हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरुंदा इथल्या एका घरात काल (2 मे) मध्यरात्री झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर घरही जळून खाक झालं.
सोनाजी आनंदराव दळवी, त्यांची पत्नी सुरेखा सोनाजी दळवी आणि मुलगी पूजा सोनाजी दळवी अशी मृतांची नावं आहेत. हे तिघे घरात असताना, मध्यरात्री अडीचच्या सुमारास गॅसचा स्फोट झाला, ज्यात तिघांचा जागीच अंत झाला.
पूजा दळवी ही पुण्यात बीएचएमएसचं शिक्षण घेत होती. मात्र लग्नासाठी ती कुरुंदा इथे आई-वडिलांकडे आली होती. हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की दळवी कुटुंबाचं पूर्ण घर जळून खाक झालं.
अग्निशमन दल, पोलिस आणि गावकऱ्यांनी आग विझवली. मात्र या स्फोटात तिघेही दगावल्याने कुरुंदा गावावर शोककळा पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement