एक्स्प्लोर

पुढील तीन दिवस कसं असेल हवामान, राज्यात पावसाची शक्यता आहे का? नेमकं काय म्हणाले पंजाबराव डख

राज्यातील वातावरणात बदल (Climate Chnage) होत आहे. सध्या राज्यात पावसासाठी (Rain) पोषक हवामान होत असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली.

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात बदल (Climate Chnage) होत आहे. सध्या राज्यात पावसासाठी (Rain) पोषक हवामान होत असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली. मान्सून (Mansoon) अंदमानच्या बेटावर दाखल झाला आहे. पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रासह कोकण विभागात पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली. उर्वरीत ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असल्याचे डख म्हणाले.

1, 2 आणि 3 जून रोजी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता 

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 आणि 31 मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर  1, 2 आणि 3 जून रोजी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली. राज्यात मान्सूनची परिस्थिती चांगली आहे. राज्यात 8 जूनला मान्सून सर्वत्र सक्रिय होईल असे पंजाबराव डख म्हणाले. 

पेरणीच्या दृष्टीनं पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला 

पेरणीच्या दृष्टीनं पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. जोपर्यंत पावसाची एक वीत ओल जमिनीत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिली आहे. सध्या मान्सूनसाठी पोषक वातवरण असल्याचे डख म्हणाले.  

23 मे ते 26 मे दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट असणार

एकीकडे उष्णतेचा पारा वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातलाय. अशातच विदर्भात अवकाळी पावसाने गेल्या अनेक दिवसापासून तळ ठोकला असताना आता उष्णतेची लाटेचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आलाय. विदर्भातील अकोला येथे दिनांक 23 मे ते 26 मे दरम्यान पुढील चार दिवस उष्णतेची लाट असणार आहे. तसेच 23 मे पासून पूढील 48 तास विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि अमरावतीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, तसेच 30 ते 40 किमी प्रतितास सोसाट्याचा वाऱ्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट  जाहीर करण्यात आला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

दरम्यान, आजही काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.  बार्शी शहरात मुसळधार पावसामुळे फळबागा धोक्यात आल्याची माहिती मिळत आहे. दुपारनंतर बार्शीतील वातावरणात अचानक बदल झाला. यानंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागिकांनी योग्य ती खबदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Unseasonal Rain : विदर्भात अवकाळी पावसाचा धूमाकूळ सुरूच; तर पुढील चार दिवस 'या' जिल्ह्यात उष्णतेची लाट  

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीच्या टायमिंगमुळे खळबळ, तर तटकरेंचा वेगळा दावा
मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीच्या टायमिंगमुळे खळबळ, तर तटकरेंचा वेगळा दावा
धक्कादायक! वादळी वाऱ्यासह पावसानं भिंत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, सांगली जिल्ह्यात हळहळ
धक्कादायक! वादळी वाऱ्यासह पावसानं भिंत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, सांगली जिल्ह्यात हळहळ
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget