एक्स्प्लोर

Unseasonal Rain : विदर्भात अवकाळी पावसाचा धूमाकूळ सुरूच; तर पुढील चार दिवस 'या' जिल्ह्यात उष्णतेची लाट  

Vidarbha Unseasonal Rain : विदर्भात अवकाळी पावसाचे सावट कायम असताना आता उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलाय. 23 मे ते 26 मे दरम्यान चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे.

Vidarbha Unseasonal Rain : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं उन्हाचा तडाखा सुरु आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) कहर आहे. दरम्यान, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha) पुन्हा एकदा अवकाळी पावसाने(Unseasonal Rain) दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी काल दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान (Crop Loss) केले आहे.

तर या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय. अवकाळी पावसाचे सावट कायम असताना विदर्भात पुढील काही दिवस अवकाळी ढग कायम असून आता उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलाय.   

पुढील चार दिवस 'या' जिल्ह्यात उष्णतेची लाट  

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण बघायला मिळत आहे. एकीकडे उष्णतेचा पारा तपात असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. अशातच विदर्भात अवकाळी पावसाने गेल्या अनेक दिवसापासून तळ ठोकला असताना आता उष्णतेची लाटेचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला येथे दिनांक 23 मे ते 26 मे दरम्यान पुढील चार दिवस उष्णतेची लाट असणार आहे. तसेच उद्या 23 मे पासून पूढील 48 तास विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि अमरावती येथे विजांच्या कडकडाटासह वादळ, 30-40 किमी प्रतितास सोसाट्याचा वाऱ्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट  जाहीर करण्यात आला आहे. परिणामी, संभाव्य धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.            

केळी पिकांचेही प्रचंड नुकसान

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील गुंज माळकिनी या शेत शिवारात मंगळवरच्या रात्री झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने केळी बागेचे मोठे नुकसान केले आहे. यात केळी पीक हे परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना वादळी वाऱ्यामुळे बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे गत दोन महिन्यांमध्ये विविध पिकांच्या नुकसानीची ही पाचवी वेळ असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

शेतमालाच्या नुकसानीचे तातडीने कृषी विभाग व महसूल विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी अमोल मदने, पांडुरंग चव्हाण, प्रकाश चव्हाण, गजानन काळकर, ज्ञानेश्वर नलगे, लक्ष्मण चव्हाण, शिवाजी मदने, गजानन मदने, अनिल खंदारे,  पांडुरंग पवार, अभिनव जाधव ,रवी भोने, रामदास चव्हाण अरुण भोने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Yavatmal News: खळबळजनक! शिळे मटण खाल्ल्याने 19 जणांना विषबाधा; यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Embed widget