(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sundar Hatti Jotiba : कुलदैवत जोतिबाच्या पालखीचा मानकरी 'सुंदर' हत्तीचे कर्नाटकमध्ये निधन; उशिरा माहिती दिल्याने भाविकांसह वारणा खोऱ्यात नाराजी
जोतिबा देवाचा मानकरी असलेल्या 'सुंदर' हत्तीचा कर्नाटकमध्ये निधन झाले. मृत्यू होऊनही कोणतीच वारणा उद्योग व शिक्षण समूहाला जोतिबा देवस्थानला देण्यात न आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Sundar Hatti Jotiba : दख्खनचा राजा कुलदैवत जोतिबा देवाचा मानकरी असलेल्या 'सुंदर' हत्तीचा कर्नाटकमधील बनारगट्टा पार्कमध्ये निधन झाले. 27 ऑगस्ट रोजी मानाच्या सुंदर हत्तीचा मृत्यू होऊनही कोणतीच माहिती वारणा उद्योग व शिक्षण समूहाला जोतिबा देवस्थानला देण्यात न आल्याने भाविकांसह वारणा खोऱ्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुंदरच्या भेटीसाठी गेलेल्या भक्तांना सुंदरच्या निधनाची वृत्त समजताच धक्का बसला. त्यांनी तत्काळ आमदा डॉ. विनय कोरे यांनी मोबाईलवरून संपर्क साधून माहिती दिली. निधनाचे वृत्त त्यांना अश्रु अनावर झाले. डॉ. विनय कोरे यांनी वारणा उद्योग समूहाच्या वतीने सुंदर हत्तीला श्रद्धांजली वाहिली.
सुंदर वारणा समूहाकडून जोतिबा देवस्थानला भेट
वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीने डॉक्टर विनय कोरे यांनी जोतिबा देवस्थानला सुंदर हत्ती भेट म्हणून दिला होता. तथापिक, काही वर्षांनी प्राणी मित्र संघटने हत्तीचा छळ होत असल्याची तक्रार करत त्याची मुक्तता करून प्राणीसंग्रहालयात सोडावे, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती.
भाविक गेल्यानंतर माहिती समजली
सुंदरची देखभाल वारणा समूहाकडून सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालय सुंदरला जंगलात सोडण्याचे आदेश दिल्यानंतर जून 2014 मध्ये वारणेतून कर्नाटकमधील बनारगट्टा पार्कमध्ये सुंदर हत्तीला नेण्यात आले होते. कोल्हापूरमधील जोतिबा भक्त सुंदर हत्तीसाठी केळी, सफरचंद घेऊन खास सुंदर हत्तीला भेटण्यासाठी जात असत. दोनच दिवसांपूर्वी काहीजण बनारगट्टा पार्कमध्ये गेले असता तेथील प्रशासनाने सुंदर हत्तीची 27 ऑगस्ट रोजी निधन झाल्याचे सांगितले.
वारणा परिसरातून नाराजी
त्या भक्तांनी आमदार विनय कोरे यांना माहिती मोबाईलवरून दिली. निधनाची माहिती उद्योग समूहासह ज्योतिबा देवस्थानला देणे आवश्यक होते. मात्र, तशी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सुंदर हा जोतिबा दैवताच्या पालखीचा मानकरी होता. निधनाची माहिती वास्तविक वारणेसह ज्योतिबा देवस्थानला कळविणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्याने भाविकांसह वारणा परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या