एक्स्प्लोर

Gondia News : जिल्ह्याला झेंडा मंत्री नको, तर काम करणारा पालकमंत्री द्या! अदिती तटकरे यांच्या नावाच्या चर्चेनंतर गोंदियाकरांची मागणी

 Gondia News : गोंदिया जिल्ह्याला खूप दूरचा पालकमंत्री नको, तर आजूबाजूच्या जिल्ह्यातलाच पालकमंत्री हवा आणि काम करणारा पालकमंत्री हवा. फक्त झेंडा मंत्री नको, अशी मागणी गोंदियाकरांनी केली आहे. 

Gondia News गोंदिया : स्थानिक पालकमंत्र्यांच्या बाबतीत गोंदिया जिल्हा (Gondia News) नेहमीच दुर्दैवी ठरला आहे. जिल्हा निर्मितीनंतर महादेवराव शिवणकर आणि राजकुमार बडोले वगळता आतापर्यंत इतर जिल्ह्यातील नेतेच पालकमंत्री म्हणून लाभले आहे. तर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आतापर्यंत साडेचार वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला पाच पालकमंत्री मिळाले. हे पाचही पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यातील असून या पालकमंत्र्यांनी फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे अशा महत्त्वाच्या सणाला झेंडावंदन करीताच गोंदिया जिल्ह्यात हजेरी लावली.

नुकताच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडत असल्याचे एबीपी माझा शी  बोलताना सांगितले होते. त्यानंतर आता गोंदिया जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळणार आहे. मात्र, अशातच नागरिकांनी आता गोंदिया जिल्ह्याला खूप दूरचा पालकमंत्री नको, तर आजूबाजूच्या जिल्ह्यातलाच पालकमंत्री हवा आणि काम करणारा पालकमंत्री हवा फक्त झेंडा मंत्री नको, अशी मागणी गोंदियाकरांनी केली आहे. 

अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री

अदिती तटकरे (Aditi Tatkare) या गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री होणार, अशी विश्वसनीय माहिती एबीपी माझाला राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. धर्माराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अदिती तटकरे यांचा नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा निर्णय घेत गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडण्याबाबतच्या निर्णयाची माहिती अजित पवार यांना दिली असल्याचंही त्यांनी गुरुवारी बोलताना सांगितलं. धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रकृतीच्या कारणामुळं आणि गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करायचं असल्यानं हा निर्णय घेतल्याचं म्हटलेलं आहे. अशातच आता गोंदियाकरांची प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्रि पद सोडणार असल्याचं धर्मराव बाबा आत्राम यांनी एबीपी माझाशी फोनवर बोलताना सांगितलं. धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे, असं देखील सांगितलं. गोंदियापर्यंतचा प्रवास रस्ते मार्गानं करणं वारंवार शक्य होत नाही, असंही आत्राम म्हणाले आहेत. 

हे आहेत गोंदिया जिल्ह्याचे शेवटचे 5 पालकमंत्री 

1) धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी ) गडचिरोली जिल्हा..

2) सुधीर मुनगंटीवर (भाजप) चंद्रपूर जिल्हा..

3) प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी) अहमदनगर जिल्हा 

4) नवाब मलिक (राष्ट्रवादी) मुंबई 

5) अनिल देशमुख (राष्ट्रवादी) नागपुर

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget