Aditi Tatkare Guardian Minister: अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री, लवकरच अधिकृत घोषणा
Aditi Tatkare Guardian Minister: आदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री होणार असून धर्मरावबाबा आत्राम यांनी पालकमंत्रीपद सोडल्यावर तटकरेंचं नाव निश्चित आहे.
![Aditi Tatkare Guardian Minister: अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री, लवकरच अधिकृत घोषणा Aditi Tatkare is new guardian minister of Gondia district After Dharmarao Baba Atram Decision to leave post Ajit Pawar NCP Maharashtra Politics Aditi Tatkare Guardian Minister: अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री, लवकरच अधिकृत घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/14/05d0ea9c36a8efffa521ee3f035da8b91689336770864129_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aditi Tatkare Guardian Minister: गोंदिया : अदिती तटकरे (Aditi Tatkare) या गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री होणार आहे. एबीपी माझाला राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. धर्माराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अदिती तटकरे यांचा नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा निर्णय घेत गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडण्याबाबतच्या निर्णयाची माहिती अजित पवार यांना दिली असल्याचंही त्यांनी गुरुवारी बोलताना सांगितलं. धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रकृतीच्या कारणामुळं आणि गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करायचं असल्यानं हा निर्णय घेतल्याचं म्हटलेलं.
विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्रि पद सोडणार असल्याचं धर्मराव बाबा आत्राम यांनी एबीपी माझाशी फोनवर बोलताना सांगितलं. धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे, असं देखील सांगितलं. गोंदियापर्यंतचा प्रवास रस्ते मार्गानं करणं वारंवार शक्य होत नाही, असंही आत्राम म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झालेला. या मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पाडोळे विजयी झाले. या जागेवर जरी भाजपचा उमेदवार असला तरी भंडारा-गोंदियाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसवर होती. मात्र, तिथे महायुतीला यश मिळालं नाही. त्यामुळे आत्राम यांनी अचानक गोंदियाचा पालकमंत्री पद सोडण्यामागे राजकीय कारणंही आहेत का? अशी शंका निर्माण होत आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर धर्मराव बाबा अत्राम यांची अजित दादांना साथ
महाविकास आघाडीच्या काळात धर्मराव बाबा आत्राम हे मंत्री होते. याशिवाय अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील त्यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री बनले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)