एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाणे महापालिकेत मतदारांना चारही जागांसाठी मतदान अनिवार्य
ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये प्रत्येक प्रभागात बहुसदस्यीय पद्धत राबवण्यात येत आहे. त्यामुळे एका प्रभागातून मतदाराला एकूण चार जागा असून या चारही जागांसाठी मतदान करणे अनिवार्य असल्याचं महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
मतदान केंद्रावर असलेल्या बॅलेट युनिट मशिनवर सर्व मतदारांसाठी सुलभ रचना करण्यात आली आहे. चार जागांच्या मतपत्रिकांसाठी चार रंगाची निवड करण्यात आली आहे.
अ जागेसाठी 'पांढरा रंग',
ब जागेसाठी 'गुलाबी रंग',
क जागेसाठी 'पिवळा रंग',
ड जागेसाठी 'फिकट निळा रंग'
याप्रमाणे चार रंगाच्या मतपत्रिका बनवण्यात आलेल्या आहेत.
मतदारांनी 'अ' जागेसाठी मतदान करताना 'पांढऱ्या' रंगाच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवाराच्या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबायचं आहे. त्याचप्रमाणे 'ब' जागेसाठी 'गुलाबी', 'क' जागेसाठी 'पिवळ्या', तर 'ड' जागेसाठी 'फिकट निळ्या' रंगाच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवारांपैकी निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबायचं आहे.
एखाद्या मतदाराला अपवादात्मक परिस्थितीत नापसंती दर्शवावयाची असेल तर त्यांना NOTA (None of the above) या बटणाचा वापर करण्याची सुविधा प्रत्येक जागेसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे
एका मतदाराने चारही जागांसाठी मतदान करायचं असून, चार जागांसाठी मतदाराने प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेवरील एक मत, असं चार वेळा मतदान (बटण दाबावं) करावं.
एका मतदाराने चारपेक्षा कमी वेळा मत दिल्यास, देण्यात आलेली मतंही ग्राह्य धरली जाऊ शकणार नाहीत. किंवा त्याच्या मतांची मशीनमध्ये नोंद होणार नाही. मतदाराने चारही जागांसाठी मतदान केल्यानंतर आवाज आल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement