एक्स्प्लोर
भिकाऱ्यांच्या वेशात रेल्वे रुळांवर हल्ल्याचा डाव, अलर्ट जारी
मुंबई : कानपूर आणि भोपाळ रेल्वेकांडानंतर आता महाराष्ट्रातल्या रेल्वे रुळांवर देखील घातपात होण्याची शक्यता महाराष्ट्र पोलिसांनी वर्तवली आहे. महाराष्ट्र पोलीसांनी रेल्वेला पत्र लिहून सुरक्षा वाढविण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या मते दहशतवतवादी संघटना एक मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत आहेत. भिकारी किंवा विक्रेत्यांच्या वेशात दहशतवादी घातपात घडवू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
रेल्वे विभागाने यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. यात रेल्वे स्टेशन आणि ट्रकवर पेट्रोलिंग वाढवण्याच्या तसंच भिकारी, विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुंबई आणि आसपासच्या परिसरात रेल्वे ट्रॅकवर सामान किंवा दगड ठेवल्याचे प्रकार उघड झाले होते. त्यानंतर आता थेट गुप्तचर विभागानंच घातापाताची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील रेल्वे रुळांसदर्भातील आतापर्यंतच्या घटना :
- 25 जानेवारी - दिवा रेल्वेस्थानकाजवळ रात्री उशिरा 15 फूट लांबीचा रूळाचा तुकडा सापडला
- 27 जानेवारी - दिवा-पनवेल मार्गावर तळोजा पोलिस स्टेशनअंतर्गत रेल्वेरूळावर जिलेटिनच्या कांड्या आढळल्या
- 7 फेब्रुवारी - अकोला-हैदराबाद रेल्वेमार्गावर लोहगड ते अमनवाडी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळावर मोठा दगड आढळला
- 9 फेब्रुवारी - पनवेल-जेएनपीटी मार्गावर जसई रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेरूळावर ओव्हरहेड वायरचा खांब आढळला
- 10 फेब्रुवारी - नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी ओढा स्थानकाजवळ रेल्वेरूळावर 5 फूट उंच दगड आढळला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement