एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये टँकर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू
औरंगाबाद पैठण रस्त्यावर पाण्याचं टँकर आणि एका अॅपे रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद पैठण रस्त्यावर पाण्याचं टँकर आणि एका अॅपे रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. सुदैवाने यात एक चिमुकली बचावली आहे.
पैठण रस्त्यावरील गेवराई तांड्याजवळ हा अपघात झाला. पाण्याने भरलेला टँकर औरंगाबादच्या दिशेनं येत होता. तर रिक्षा चितेगावच्या दिशेनं येत असताना हा भीषण अपघात झाला आहे.
दरम्यान, अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटण्यातही अडचणी येत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement