एक्स्प्लोर

Savitribai Phule Pune University : मार्कशीटसाठी विद्यार्थ्याकडून घेतले पैसे; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील लाचखोर कर्मचाऱ्याचं अखेर निलंबन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने लुटारु कर्मचाऱ्यावर कडक कारवाई केली आहे. मार्कशीटसाठी  विद्यार्थ्याकडून पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने (Savitribai Phule Pune University) लुटारु कर्मचाऱ्यावर कडक कारवाई केली आहे. मार्कशीटसाठी विद्यार्थ्याकडून पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची लूट करणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे आणि कर्मचाऱ्यांना सावधानतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. 

नेमकं काय घडलं होतं?

ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट समजल्या जाणाऱ्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून दोन दिवसांपूर्वी धक्कादायक प्रकार समोर आला होता. विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी करत असल्याचं समोर आलं होतं. या सगळ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. मार्कशीटसाठी चार हजार रुपये मागत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडे केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी तीन हजार रुपये या कर्मचाऱ्याला दिले होते. ज्या नोटा दिल्या त्या नोटांच्या नंबरचा फोटो या विद्यार्थ्यांनी काढून ठेवला होता.

हा सगळा प्रकार घडल्यानंतर कर्मचाऱ्याकडून त्याच लाच म्हणून घेतलेल्या नोटा परत मागितल्या आणि याचा व्हिडीओ व्हायरल केला होता. मार्कशीट मागणारा प्रथम भंडारी हा विद्यार्थी बीएचं शिक्षण घेत आहे. याच विद्यार्थ्याकडून नेवासे नावाच्या कर्मचाऱ्याने पैसे घेतले असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विद्यार्थ्याकडे चार हजार रुपये मागितले होते मात्र तीन हजार रुपये घेतल्याचं समोर आलं होतं. या विद्यार्थ्यांच्या तक्रारीची शाहनिशा करुन विद्यापीठ प्रशासनाने या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई केली आहे. कर्मचाऱ्याचं थेट निलंबन करण्यात आलं आहे. अभाविपनेदेखील याविरोधात तक्रार दिली होती त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे वेगवेगळे आरोप

विद्यापीठातील विद्यार्थी मार्कशीट किंवा अन्य कोणत्याही कागदपत्रासाठी विद्यापीठातील संबंधित विभागाकडे जात असतात मात्र या विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीचे उत्तरं दिले जातात किंवा त्यांना रोज चकरा मारायला लावत असल्याचं आतापर्यंत अनेकदा समोर आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागतो आणि त्यांचा वेळही वाया जातो. त्यासोबतच पैशाचीही मागणी करुन विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pune PMPML Bus : चालक बनला देवदूत! PMPML बसचा ब्रेक फेल झाला अन् चालकाने बस झाडावर आदळली; प्रवाशांचा वाचवला जीव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Shivraj Motegaonkar NEET Exam: NTA च्या प्रश्नपत्रिका पॅनलमध्येच स्वत:ची माणसं घुसवली; शिवराज मोटेगावकरचा कट सीबीआय चौकशीत उघड, मुलालाही पेपर दिल्याचा संशय
NTA च्या प्रश्नपत्रिका पॅनलमध्येच स्वत:ची माणसं घुसवली; शिवराज मोटेगावकरचा कट सीबीआय चौकशीत उघड, मुलालाही पेपर दिल्याचा संशय
Petrol Diesel Shortage: संतापाचा कडेलोट! बुलढाण्यात इंधन टंचाईचा सहावा दिवस, शेतकऱ्यांची रात्र पेट्रोल पंपावर, दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचं भयावह चित्र
संतापाचा कडेलोट! बुलढाण्यात इंधन टंचाईचा सहावा दिवस, शेतकऱ्यांची रात्र पेट्रोल पंपावर, दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचं भयावह चित्र
Dhananjay Munde meet Devendra Fadnavis: परळीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंनी स्वत: भेट घेऊन आभार मानले
परळीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंनी स्वत: भेट घेऊन आभार मानले

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
Petrol Diesel price Hike: पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Sunetra Pawar EV Car: पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी ईव्ही कार पाहिलीत का?
पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवार ईव्ही कार वापरणार, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी कार पाहिलीत का?
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
Heat Wave: विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
Embed widget