Maharashtra Politics : जागावाटपासाठी भाजप नेते मातोश्रीच्या दारात उभे राहत होते, मग खरी शिवसेना कुणाची; सुषमा अंधारेंची मोदींवर टीका
Maharashtra Politics : जागावाटपासाठी भाजप नेते मातोश्रीच्या दारात उभं राहियेचे, पण तेच नेते टेंभी नाक्यावर कधी गेल्याचे पाहायला मिळाले नाही, असे म्हणत अंधारे यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिले आहे.
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शिवसेनाच (Shiv Sena) असली शिवसेना असून, उद्धव ठाकरेंची ( Uddhav Thackeray) शिवसेना नकली शिवसेना असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी चंद्रपूरच्या (Chandrapur) सभेतून केली आहे. त्यांच्या याच टीकेला आता ठाकरे गटाकडून (Thackeray Group) प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ठाकरे गटांच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मोदी यांच्यासह शिंदे गटावर (Shinde Group) हल्लाबोल केला आहे. जागावाटपासाठी भाजप नेते (BJP Leader) मातोश्रीच्या दारात उभं राहियेचे, पण तेच नेते टेंभी नाक्यावर (Tembhi Naka) कधी गेल्याचे पाहायला मिळाले नाही, त्यामुळे खरी शिवसेना कुणाची?, असे म्हणत अंधारे यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिले आहे.
दरम्यान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना अंधारे म्हणाल्या की, “गोंदियाच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरी शिवसेना शिंदेंची आहे आणि तेच खरे शिवसेनाप्रमुख असल्याची मुक्ताफळे नेहमीप्रमाणे उधळलेली आहे. पण, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवण करून दिली पाहिजे, जेव्हा वंदनीय बाळासाहेब हयात होते. त्यावेळी जेव्हा कधी जागा वाटपाची चर्चा व्हायची, तसेच जेव्हापासून उद्धव ठाकरे शिवसेना पाहत आहे त्यावेळी देखील जेव्हा कधी जागा वाटपाची चर्चा झाली, त्यावेळी जागावाटपाच्या चर्चेसाठी भाजपची मंडळी मातोश्रीचे उंबरे झिजवायचे. बाळासाहेबांच्या काळात अडवाणी असतील किंवा अटलजी असतील, गडकरी असतील किंवा मुंडे साहेब असतील, तसेच उद्धव ठाकरेंच्या काळात मोदी असतील किंवा शाह असतील हे मुंबईत मातोश्रीवर यायचे. आम्हाला किती जागा देतायेत यासाठी अत्यंत याचिकाकासारखे मातोश्रीच्या दारात उभे राहायचे. त्यावेळी आम्ही आमच्या अटी शर्तीवर तुमच्या सोबत युती करत होतो," असे म्हणत अंधारे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
'फितुरांचा प्रमुख मुजरे करत दिल्लीला गेला'
याचवेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "जेव्हापासून आमच्यातील एक गॅंग फितूर झाली आहे. त्या फितुराच्या प्रमुखाला शक्य झालं नाही की, एकदाही टेंभी नाक्यावर मोदी किंवा शहा यांना त्यांनी जागा वाटपासाठी बोलावले. उलट टेंभी नाक्यावरील माणूस मुजरे करत दिल्लीला गेला. याच्यातूनच खरी शिवसेना कोणाची आहे हे स्पष्ट होतं," असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या :