फडणवीस तुमच्यात हिंमत असेल तर RSS चे हेडक्वार्टर उध्वस्त करा, अंधारेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, खाकी चड्डी आणि काळी टोपीवाले दीक्षाभूमीवर उभे करा
देवेंद्र फडणवीस तुमच्यात हिंमत असेल तर आधी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुवादी विचारांना कडाडून विरोध केला, त्या विचारांवर चालणारे RSS चे हेडक्वार्टर उध्वस्त करा, असे मत सुषमा अंधारेंनी व्यक्त केले.
Sushma Andhare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्यात जर हिंमत असेल तर आधी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुवादी विचारांना कडाडून विरोध केला, त्या विचारांवर चालणारे आरएसएस हेडक्वार्टर उध्वस्त करा, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं. सगळे खाकी चड्डी आणि काळी टोपीवाले लोक दीक्षाभूमीवर ओळीने उभे करा आणि मग त्यांच्या तोंडून बाबासाहेब ऐकायला लोक तयार होतील असे अंधारे म्हणाल्या. खबरदार, तुमच्या बेकीच्या राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव वापराल तर याद राखा असा इशारा देखील अंधारे यांनी दिला.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
निवडणुकींच्या आधी हा हिंदू, तो मुस्लिम, हा मराठा, तो ओबीसी अशी तोडफोड करणं ही देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील आजच्या राजकारणाची गरज आहे. कारण आज आणखी महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. पूरग्रस्त भागातील प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, वाढती महागाई, पुण्यातील मुंबईतील वाढती गुन्हेगारी या सगळ्या विषयावर सपशेल अपयशी ठरलेल्या फडणवीसांना नॉन इशूवर चर्चा करणे ही त्यांच्या करीअरची गरज आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या ब्रिगेडला आता बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरायला सांगितले आहे. बाबासाहेब यांच्याबद्दल तुमचा आदर नक्की व्यक्त करा पण फडणवीस जरा सावधान. जरा सावधानतीने तुम्ही व्यक्त व्हा. बाबासाहेब यांच्याबद्दल खऱच प्रमे आदर असेल तर त्यांचे अनेक संदर्भ आणि दाखले द्यायचे असतील तर बाबासाहेब तुम्हाला इतके सहजासहजी पेलणारे झेपवणारे नाहीत. बाबासाहेब पचवायचे असतील तर त्यांनी मनुवादी विचारांना त्यांनी विरोध केला होता. फडणवीस तुम्हाला बाबासाहेबांचे तुम्हाला अनुयायी व्हायचे असतील तर तुम्ही मनुवादी विचारांचे केंद्र असलेल्या आरएसएसला उद्धस्त करा. त्यानंतर मग खाकी चड्डीवाले काळे टोपीवाले सगळे ओळीने दीक्षाभूमीवर उभे करा. मग आम्ही बाबासाहेब सांगू असे अंधारे म्हणाल्या.
बाबासाहेबांचे नाव तुमच्या राजकारणासाठी वापरु नका
देवेंद्र फडणवीस तुमच्यात जर हिंमत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विचारांना विरोध केला, त्या विचारावर चालणारे आरएसएसचे हेडक्वाटर पूर्णपणे उध्वस्त करा आणि दीक्षाभूमीवर सरेंडर व्हा. तरच तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार मिळेल असे अंधारे म्हणाल्या. अन्यथा बाबासाहेबांचे नाव तुमच्या राजकारणासाठी वापरु नका असे अंधारे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
























