रायगडमध्ये महायुती राहणार का? सुनिल तटकरे म्हणाले योग्य वेळी अचूक निर्णय, मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा
रायगडमध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती राहणार का? या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी वेट अँड वॉचचा सल्ला दिला आहे.
Sunil Tatkare : रायगडमध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती राहणार का? या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी वेट अँड वॉचचा सल्ला दिला आहे. नगर पालिकेचे निकाल लागू द्या, महानगर पालिकेच रणशिंग फुंकलय, त्या वेळेला कसकस कायकाय होतं ते आपण वाट बघत राहा असं तटकरे म्हणाले. योग्य वेळेला अचुक निर्णय या राष्ट्रवादीच्या ब्रिद वाक्याची तटकरे यांनी आठवण करून दिली आहे.
सामंजस्याच्या वातावरणातून निवडणुका लढवण्याबाबत आम्ही सकारात्मक
राज्यात राष्ट्रवादीच यश ठळकपणाने चांगलच असेल आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि सोबत भाजप युती आहे तिथे शंभर टक्के यश मिळेल असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी नगर पालिका निवडणुक निकालावर बोलताना व्यक्त केला आहे. सामंजस्याच्या वातावरणातून निवडणुका लढवण्याबाबत आम्ही सकारात्मक असल्याचेही तटकरे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अजित दादा आणि मी संयुक्तपणाची चर्चा केल्याचे तटकरे यांनी सांगितले. निवडणुका लढताना एकवाक्यता कशी राहिल या बाबत चर्चा झाल्याचे तटकरे यावेळी म्हणाले. रविंद्र चव्हाण, बावनकुळे, गिरीष महाजन, चंद्रकांतदादा पाटील, मुरलिधर मोहोळ यांच्याशी आपण बोललो असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात महायुती कशी बळकट राहिल यासाठी माझा प्रयत्न
अजितदादांच्या मध्यस्थीनंतर रायगडमधील शिवसेना राष्ट्रवादीमधील संघर्ष थांबेल का? यावर बोलताना राज्यात महायुती कशी बळकट राहिल या प्रयत्नातील मी एक कार्यकर्ता असल्याचे सुनील तटकरे म्हणाले आहेत. अजितदादा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. एकत्र बसून काही निर्णय घ्यायचे असतील तर वरिष्ठ सांगू शकतात. मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असल्याचे तटकरे म्हणाले. आमची सहा जणांची सामंजस्यासाठीची कमिटी आहे. त्यामुळे सामंजस्याच्या माध्यमातून वाटचाल कशी करायची, राज्यात महायुती कशी बळकट राहिल या प्रयत्नातील मी एक कार्यकर्ता आहे असे तटकरे म्हणाले.
राज्यात महानगर पालिका निवडुकींचे बिगुल वाडले आहे. त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. काही ठिकाणी महायुती होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पुढच्या काही दिवसातच जिल्हा परिषद आण पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये महायुती होणार की नाही हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.























