एक्स्प्लोर

Sujat Ambedkar On Congress INDIA Alliance : तुम्हाला संधी दिलीय, आता पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू; सुजात आंबेडकरांचा इंडिया आघाडीला इशारा

Congress I.N.D.I.A. Alliance : इंडिया आघाडीतील समावेशाबाबत तुम्हाला संधी दिली होती. त्या आता पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू असा इशारा सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला आहे.

Sujat Ambedkar On I.N.D.I.A. Alliance : तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका.. पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू.! असा इशारा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी इंडिया आघाडीला (I.N.D.I.A. Alliance) दिला आहे. सुजात आंबेडकर यांनी कंधार-लोहा विधान सभा मतदारसंघात निर्धार मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी इंडिया आघाडीला इशारा दिला. सुजात आंबेडकर यांनी म्हटले की, दिल्लीतील एक व्यक्ती आहेत. ते भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. भारत जोडण्याआधी जाती तोडाव्या लागणार आहेत. त्यासाठी आंबेडकरवाद आणि बाबासाहेबांना जवळ घ्यावे लागेल, असेही त्यांनी म्हटले.

वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीत समावेश करण्याबाबत काँग्रेसला पत्र लिहिले होते. त्यावर अजूनही कोणता निर्णय झाला नाही. त्यावर वंचितने आक्रमक भूमिका घेतली आहे.  

आमचा लढा वंचितांचा...आणखी एक टर्म सत्तेबाहेर बसू

सुजात आंबेडकर यांनी म्हटले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अजूनही काँग्रेसने अजूनही निर्णय घेतला नाही. आम्ही तर वंचित आहोत. आम्ही वंचितांचा लढा उभारत आहोत. आम्ही आणखी एक टर्म सत्तेबाहेर राहिलो तर आम्हाला काही फरक पडणार नाही. तुमच्या संस्था, सहकारी संस्था, नातेवाईक टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही पक्ष बदलत आहात, अशी टीका त्यांनी केली. दोन टर्म सत्ता गेल्यानंतर तुमच्या पक्षाची अवस्था दिसून आली आहे. आम्ही सत्तेत जाण्यासाठी आसूसलेलो नाहीत. आम्ही लढणं सोडणार नाहीत. 

काँग्रेसकडे अजूनही वेळ आहे...

काँग्रेसकडे अजूनही वेळ आहे. त्यांनी प्रस्तावावर विचार करावा असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. वंचितने आपली ताकद दाखवून दिली आहे. तुम्ही आम्हाला घेतलं नाही तरी आम्ही लढणं सोडणार नसल्याचे सुजात आंबेडकर यांनी म्हटले. पण, आम्ही लढलो आणि अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह 15-20 आमदार 25-30 खासदार घरी बसले तर आमच्याकडे रडत यायचं नाही. तुम्हाला संधी दिली होती, नंतर आम्ही रडगाणे ऐकणार नाही. पुन्हा रडलात तर ठोकून काढू असा इशाराही सुजात आंबेडकर यांनी दिला. 

राहुल गांधी यांच्यावरही टीका

सुजात आंबेडकर यांनी  राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी यांनी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडणार असल्याचे म्हटले होते. हे प्रेमाचे दुकान छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोरममध्ये उघडणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, छत्तीसगड, राजस्थानमध्ये असलेले दुकान बंद पडले. तर, मध्य प्रदेशमध्ये दुकान उघडण्याचीही संधी दिली गेली नाही. तेलंगणामध्ये भाजप नव्हता. बीआरएस आणि एमआयएम प्रमुख पक्ष होते. तिथे विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री म्हणून एबीव्हीपी, संघाची पार्श्वभूमी असलेल्या रेवंथ रेड्डीला संधी दिली गेली असल्याचे सुजात यांनी म्हटले. ही दुटप्पी भूमिका थांबवण्याची आवश्यकता असल्याचे सुजात यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget