Sugarcane : विनापरवाना ऊसाचं गाळप, 22 कारखान्यांना 176 कोटींचा दंड; सोलापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांचा समावेश
Sugarcane Season 2022-23 : ऊस गाळप परवाना उल्लंघनप्रकरणी राज्यातील 22 साखर कारखान्यांना 176.54 कोटी रुपयांचा दंड केला आहे.
Sugarcane Season 2022-23 : साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी 2022-23 च्या हंगामात विनापरवाना ऊस गाळप केलेल्या साखर कारखान्यांना (sugar factory) दणका दिला आहे. ऊस गाळप परवाना उल्लंघनप्रकरणी राज्यातील 22 साखर कारखान्यांना 176.54 कोटी रुपयांचा दंड केला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार एफआरपीची (FRP) रक्कम आणि अन्य शासन निधीची कपात दिल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्यांना 2022-23 मधील ऊस गाळप परवाना द्यायचा नाही, असा धोरणात्मक निर्णय झाला होता. तरीही काही कारखान्यांनी या निर्णयास वाटाण्याच्या अक्षता लावून शासनाची विविध देय रक्कम आणि थकीत एफआरपी देणे बाकी असतानाही परस्पर विनापरवाना ऊस गाळप सुरू केले होते. गाळप परवान्यातील अटींचा भंग करुन विनापरवाना गाळप समोर आले आहे. यामध्ये राज्यातील 22 साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक कारखाने हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखाने कोणते
आष्टी शुगर- एक कोटी 12 लाख 67 हजार 500
सिद्धनाथ शुगर- सहा कोटी 51 लाख 87 हजार 500
ओंकार शुगर- 41 लाख 14 हजार 500
मकाई- सात कोटी 96 लाख 67 हजार 500
मातोश्री लक्ष्मी शुगर- एक कोटी 16 लाख 52 हजार 500
श्री शंकर सहकारी- एक कोटी 61 लाख 46 हजार 500
भीमा सहकारी- 13 कोटी 3 लाख 55 हजार
जकराया- 10 कोटी 57 लाख 20 हजार.
पुणे जिल्हा
कर्मयोगी शंकरराव पाटील- 19 कोटी 64 लाख 45 हजार 500
नीराभीमा तीन कोटी 16 लाख,
राजगड- दोन कोटी 62 लाख 75 हजार 500
धाराशिव जिल्हा
डीडीएनएसएफए एक कोटी 27 लाख,
कंचेश्वर तीन कोटी 64 लाख 30 हजार
जालना जिल्हा
श्रद्धा एनर्जी 15 कोटी 97 लाख 95 हजार 500
रामेश्वर- पाच कोटी 52 लाख 50 हजार
समृद्धी शुगर्स 14 कोटी 64 लाख 18 हजार 500
हिंगोली जिल्हा
टोकाई- पाच कोटी 45 लाख 25 हजार
कोल्हापूर जिल्हा
तात्यासाहेब कोरे नऊ कोटी 61 लाख 45 हजार
बीड जिल्हा
जयभवानी दोन कोटी 44 लाख 30 हजार 500
परभणी जिल्हा
बळिराजा-25 कोटी 4 लाख 35 हजार
जळगाव जिल्हा
संत मुक्ताई- 15 कोटी 3 लाख 85 हजार
छत्रपती संभाजीनगर
घृणेश्वर 10 कोटी 4 लाख 53 हजार
या वरील 22 साखर कारखान्यांनी विना परवाना ऊस गाळप केलं आहे. त्यामुळं त्यांना आथिर्क दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त साखर कारखान्यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी विनापरवाना ऊसाचं गाळप सुरु केलं होतं. त्या सर्व कारखान्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.