![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापूर, सांगली वगळता इतर ठिकाणी आंदोलन सुरु राहणार : राजू शेट्टी
राजू शेट्टी राजकीय स्वार्थापोटी ऊसदर आंदोलन करत असल्याच आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला होता. "आंदोलनात माझा राजकीय हेतू नव्हता. मात्र काही शुद्र लोक माझ्यावर असे आरोप करत असल्याच टोला राजू शेट्टींनी सदाभाऊ खोत यांना लगावला.
![कोल्हापूर, सांगली वगळता इतर ठिकाणी आंदोलन सुरु राहणार : राजू शेट्टी sugarcane rate issue, protest will continue in remaining Maharashtra कोल्हापूर, सांगली वगळता इतर ठिकाणी आंदोलन सुरु राहणार : राजू शेट्टी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/11105554/raju.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : कोल्हापूर आणि सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आजचं चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. मात्र कोल्हापूर आणि सांगलीत बंद मागे घेतला असला तरी इतर जिल्ह्यात बंद सुरूच राहणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
राजू शेट्टी राजकीय स्वार्थापोटी ऊसदर आंदोलन करत असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला होता.आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही आंदोलने सुरू असून ही निव्वळ स्टंटबाजी असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला होता. "आंदोलनात माझा राजकीय हेतू नव्हता. मात्र काही शुद्र लोक माझ्यावर असे आरोप करत आहेत", असा टोला राजू शेट्टींनी सदाभाऊ खोत यांना लगावला.
एफआरपी थकवलेल्या कारखान्यांना गाळप परवानगी देऊ नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश असताना अनेक कारखान्यांना परवानगी देण्यात आल्या. अनेक कारखान्यांनी खोटी आकडेवारी देऊन एफआरपी दिल्याचे भासवले आहे. यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखाण्याचाही समावेश आहे. सरकार आणि कारखानदार हे संगनमताने शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
पाणीटंचाई असलेल्या मराठवाड्यात कारखाने बंद न करता वेगळ्या पद्धतीने आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत. आंदोलन केल्याखेरीज सरकार बोलणी करत नाही. ऊस अडवणार नाही, कारखाना बंद करणार नाही. लोकशाही पद्धतीने चक्काजाम आंदोलन आम्ही करणार आहोत. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे आंदोलन तीव्र झाल्याचंही राजू शेट्टी म्हणाले.
कोल्हापूर आणि सांगलीतील कारखानदारांनी सुरुवातीला एफआरपी देण्याचं मान्य करुन साखरेचे दर वाढल्यानंतर उर्वरित दोनशे रुपयांची उचल देण्याबाबत होकार दर्शवला आहे. त्यामुळेच कोल्हापूर आणि सांगलीत होणार स्वाभिमानीचं आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)