एक्स्प्लोर

ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 5 टक्के वाढ

ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व आमदार जयंत पाटील यांच्या लवादाने हा निर्णय घेतला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी ऊसतोड कामगार 19 ऑगस्टपासून संपावर होते.

बीड : ऊसतोड कामगारांच्या संपाला अखेर यश मिळालं आहे. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व आमदार  जयंत पाटील यांच्या लवादाने हा निर्णय घेतला आहे..

आपल्या विविध मागण्यांसाठी ऊसतोड कामगार 19 ऑगस्टपासून संपावर होते. ऊसतोड कामगारांच्या मजुरी वाढीसंदर्भातील मागण्या 31 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण झाल्या नाही, तर पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही ऊसतोड कामगार संघटनेने दिला होता. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ केल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अशी असेल वाढ

सध्या अस्तित्वात असलेल्या सामंजस्य करारातील ऊसतोडणी दरामध्ये दिलेल्या 20 टक्के वाढीमध्ये 5 टक्के उत्तेजनार्थ वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सध्या असलेल्या प्रतिटन 228 रुपये 19 पैसे मजुरीऐवजी आता मजुरांना प्रतिटन 239 रुपये 60 पैसे असा वाढीव दर मिळणार आहे.

गाडी सेंटर 254.62 रुपयांवरून 267.35 रुपये, टायर गाडी तोडणी 198.38 रुपयांवरुन 208.30 रुपये तर पहिल्या किमीसाठी 84 .72 रुपयांवरून 88.96 रुपये आणि पुढील प्रत्येक किमीसाठी 12.36 रुपयांवरून 12.98 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. सदरची वाढ सामजंस्य करारातील हंगाम 2018-19 आणि 2019-20 या हंगामाकरिता ग्राह्य राहणार आहे. यासंबधीचं पत्रक महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी सर्व साखर कारखान्यांना पाठवलं आहे.

संपूर्ण राज्यभरात 12 ते 13 लाख ऊसतोडणी मजूर आहेत. त्यात सर्वाधिक ऊसतोडणी मजुरांची संख्या बीड जिल्ह्यात आहेत. बीड खालोखाल नगर, उस्मानाबाद ,जालना, औरंगाबाद , जळगाव, धुळे, नंदुरबार भागात मजुरांची संख्या अधिक आहे. मुळात ज्या पद्धतीने ऊसतोड कामगारांना काम करावे लागते, त्या तुलनेत कष्टाचा मोबदला मिळत नाही.

ऊसतोड कामगारांच्या मागण्या काय होत्या?

- साल 2014-15 साठी अंतरिम दरवाढीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याची अंमलबजाणी करावी.

- ऊस तोडणी दरात 100 टक्के वाढ करावी.

- 35 टक्के कमिशन मुकादमास द्यावे सध्या ते18.5 टक्के आहे.

- कारखाना साईटवर ऊसतोड मजूर व बैलांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध कराव्यात.

- 15 रुपये प्रत्येक दिवशी बैलगाडीच्या टायर गाडीचे भाडे घेण्यात यावे.

- 30 रुपये प्रत्येक दिवशी ट्रॅक्टर गाडीचे भाडे घ्यावे.

- ऊस तोडणी मजुरांचा जीवन विमा साखर कारखान्यांनी भरावा.

- 60 वर्षांच्या पुढील ऊसतोड मजूर मुकादमास पेन्शन मिळावी.

संपूर्ण राज्यभरात 12 ते 13 लाख ऊसतोडणी मजूर आहेत. त्यात सर्वाधिक ऊसतोडणी मजुरांची संख्या बीड जिल्ह्यात आहेत. बीड खालोखाल नगर, उस्मानाबाद ,जालना, औरंगाबाद , जळगाव, धुळे, नंदुरबार भागात मजुरांची संख्या अधिक आहे. मुळात ज्या पद्धतीने ऊसतोड कामगारांना काम करावे लागते, त्या तुलनेत कष्टाचा मोबदला मिळत नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो

व्हिडीओ

Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
Embed widget