एक्स्प्लोर
दप्तर घ्या आणि कोंबड्या-बकऱ्या द्या, पालघरमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा
पालघर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या 129 शाळा बंद करण्याच्या अन्यायकारक निर्णयामुळे हजारो आदिवासी ग्रामीण विद्यार्थी शाळाबाह्य होणार आहेत. याचा निषेध म्हणून आज ‘श्रमजीवी’ने एक कल्पक आंदोलन करत सरकारच्या शिक्षण धोरणाचे वाभाडे काढले.

पालघर : पालघर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या 129 शाळा बंद करण्याच्या अन्यायकारक निर्णयामुळे हजारो आदिवासी ग्रामीण विद्यार्थी शाळाबाह्य होणार आहेत. याचा निषेध म्हणून आज ‘श्रमजीवी’ने एक कल्पक आंदोलन करत सरकारच्या शिक्षण धोरणाचे वाभाडे काढले. जिल्हा परिषदेवरील श्रमजीवीच्या मोर्चामध्ये शाळाबाह्य होत असलेले विद्यार्थी आपले शाळेचे दप्तर घेऊन आले होते. सोबत बकऱ्या आणि कोंबड्याही होत्या. ‘शाळा बंद करताय ना, मग हे दप्तर परत घ्या आणि आम्हाला कोंबड्या बकऱ्या पाळायला द्या’ अशी मागणी यावेळी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली. या मोर्चाला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालकांनी हजेरी लावली होती. ज्या शाळांमध्येत 30 पेक्षा कमी पटसंख्या आणि एक किलो मीटरच्या आतील शाळा बंद करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी दिली होती. एवढ्या मोठ्या संख्येने शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या शाळा ओस पडणार आहेत. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केलेला निधी वाया जाणार आहे. तर प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांना ये-जा करण्यास मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय, ग्रामीण भाग असल्याने विद्यार्थी तसेच पालकांना अडचणींना सामोरे जाव लागणार असल्याने पालकांकडून या समायोजनाला विरोध होऊ लागला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
























