एक्स्प्लोर
बारामतीत गणवेशासाठी विद्यार्थ्यांचं ‘बोंबाबोंब’ आंदोलन
बारामती नगरपरिषदेसमोर विद्यार्थ्यांनी बोंबाबोंब आंदोलनातून नगराध्यक्षांसह नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला.
बारामती : गेल्या दोन वर्षांपासून शालेय गणवेश दिले नसल्याने बारामतीतील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. बारामती नगरपरिषदेसमोर विद्यार्थ्यांनी बोंबाबोंब आंदोलनातून नगराध्यक्षांसह नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला.
गेल्या दोन वर्षांपासून बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश आणि अन्य शालेय साहित्य दिले जात नसल्याने आज विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षा आणि अधिकाऱ्यांना घेराव घातला.
दोन वर्षांपासून निधीची तरतूद असताना आणि प्रशासकीय मंजुरी असताना गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर साहित्य देणं टाळलं जात होतं. त्यामुळे आज विद्यार्थ्यांनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावरच नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना रोखून धरले.
स्वातंत्र्यदिनी झालेल्या या अनोख्या आंदोलनामुळे पदाधिकारी आणि प्रशासनाची धांदल उडाली. येत्या दहा दिवसांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना गणवेश व अन्य साहित्य देण्याचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील गोरगरीबांसाठी शाळा चालवल्या जातात. मागील दोन वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि अन्य साहित्य दिलं गेलं नाही.
विशेष म्हणजे गणवेश व अन्य साहित्यांसाठी नगरपरिषदेने तरतूद केली आहे, निविदाही आल्या. मात्र, केवळ जवळच्या लोकांना ठेका मिळावा यासाठी गणवेश व अन्य साहित्य देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते फैय्याज शेख यांनी स्वातंत्र्यदिनी नगरपरिषदेसमोर विद्यार्थ्यांसमवेत बोंबाबोंब आंदोलन केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement