एक्स्प्लोर
व्हीआयपींसाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित!
मुंबई : व्हीआयपींसाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रायगडमधील हेलिकॉप्टर घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचे मार्गदर्शक तत्त्वं आणखी काटेकोर करुन निर्णय घेणार असल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाकडून (डीजीसीए) सांगण्यात आले.
त्याचबरोबर, डीजीसीएकडून रायगड हेलिकॉप्टर प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. सुरक्षेत काही चूक झाली का, याचा तपास होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
रायगडमध्ये काय घडले?
रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथं मुख्यमंत्री आज एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी हेलिकॉप्टरचा पंखा त्यांच्या डोक्याला लागत होता. मात्र उपस्थित सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांनी प्रसंगावाधन दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.
अलिबाग इथं शेकाप आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळा होता. हा सोहळा संपल्यानंतर डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी 1.55 वाजण्याच्या सुमारास, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी निघाले.
ते हेलिकॉप्टरमध्ये चढत असतानाच हेलिकॉप्टरने टेक ऑफ अर्थात उड्डाणास सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरच्या वेगाने फिरणाऱ्या पंख्याखाली होते. हा पंखा मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला लागण्याची शक्यता अधिक होती. मात्र तिथे उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले.
त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा लॅन्ड करुन फॅनची रिटेस्ट घेऊन त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस मुंबईला रवाना झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement