एक्स्प्लोर

मोठी बातमी! दसऱ्याच्या दिवशीच राज्यातील 50 हजार होमगार्ड्सना खुशखबर, दुप्पट मानधनवाढीचा शासन निर्णय जारी

राज्य सरकरने राज्यभरातील होमगार्ड्सना खुशखबर दिली आहे. सरकारने होमगार्ड्सच्या मनधनात वाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 मुंबई : राज्य सरकारने राज्यातील होमगार्ड्सचा दसरा गोड केला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता याच निर्णयाच्या अमंलबजावणीला सुरुवात झाली आहे. या निर्णयाबबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून त्यांनी त्यांनी राज्यातील समस्त होमगार्ड्सना शुभेच्छा दिल्या आहेत. 

सरकारने नेमका काय निर्णय घेतला?

राज्यातील होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर राज्यातील  होमगार्ड्सना इतर राज्यातील होमगार्ड्सच्या तुलनेत सर्वाधिक मानधन मिळणार आहे. नव्या निर्णयानुसार होमगार्ड्सचे मानधन प्रतिदिवस 570 रुपयांवरून थेट 1 हजार 83 रुपये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एकूण 11 हजार 207 होमगार्ड्सची भरती करण्यात आली आहे. सध्या या होमगार्ड्सना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणार्थी होमगार्ड्सनाही नव्या निर्णयानुसारच मानधन मिळणार आहे. या होमगार्ड्स द दसऱ्याची एका प्रकारे भेटच मिळाली आहे. या निर्णयाचा एकूण 55 हजार होमगार्ड्सना लाभ मिळणार आहे. 

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

होमगार्ड्ससंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 'राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कमसुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आला आहे,' अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 

1 ऑक्टोबर 2024 पासून निर्णयाची अंमलबजावणी

तसेच,  राज्यातील सुमारे 55,000 होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. 1 ऑक्टोबर 2024 पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे 11,207 होमगार्ड्सची भरती प्रक्रियासुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सध्या त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या वर्गांना आकर्षित करण्याठी सरकारने इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

हेही वाचा :

मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या

मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय

Pankaja Munde : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dasara Melava 2024 : भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरागे? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरागे? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
Pankaja Munde: छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
Gulabrao Patil : संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSujay Vikhe Speech Dasra Melava : महाराष्ट्राची लाडकी बहीण 'पंकजाताई' दसरा मेळाव्यात सुजय विखेंचं भाषणPankaja Munde Full Speech : लेकाचं लाँचिंग, धनूभाऊसमोर पहिलं भाषण, भगवानगडावर पंकजांचा हल्लाबोलMahadev Jankar Dasara Melava Beed : पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यात जानकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dasara Melava 2024 : भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरागे? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरागे? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
Pankaja Munde: छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
Gulabrao Patil : संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
युवकांसाठी मोठी बातमी! 'या' योजनेअंतर्गत देशात 90000 रोजगाराच्या संधी, काय आहे पात्रता?
युवकांसाठी मोठी बातमी! 'या' योजनेअंतर्गत देशात 90000 रोजगाराच्या संधी, काय आहे पात्रता?
Laxman Hake on Manoj Jarange : तुम्ही शिवी दिली तर शिव्यांनी....; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान; मेळाव्याने प्रश्न सुटणार नाही, म्हणाले समोरासमोर या अन्...
तुम्ही शिवी दिली तर शिव्यांनी....; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान; मेळाव्याने प्रश्न सुटणार नाही, म्हणाले समोरासमोर या अन्...
Pankaja Munde: आपल्याला आपला डाव खेळायचा का नाय? पंकजा मुंडेंकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा
आपल्याला आपला डाव खेळायचा का नाय? पंकजा मुंडेंकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा
Pankaja Munde : जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा टोला
जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा टोला
Embed widget