एक्स्प्लोर

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'

Ajit Pawar Plane Crash: अपघात प्रकरणी अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अनेक दावे केले आहेत, त्याचबरोबर सखोल चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे.

पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक आहे. यामध्ये माझी काहीही चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा, असा जबाब व्हीएसआर या विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग (V K Singh) यांनी दिला आहे. त्यांची सीआयडीकडून कसून चौकशी सध्या सुरू आहे. या अपघात प्रकरणी अजित पवारांचे (Ajit Pawar) पुतणे आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेक दावे केले आहेत, त्याचबरोबर सखोल चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे.(Ajit Pawar)

सिंग यांची तीन दिवस चौकशी

व्ही. के. सिंग (V K Singh) आणि रोहित सिंग यांची सीआयडीने तीन दिवस चौकशी केली आहे. मात्र, नेमके कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली. मात्र याबाबत सीआयडीकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. 

अजित पवार विमान दुर्घटनेबाबत घातपाताचा संशय

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरती आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत कंपनीतल्या त्रुटी आपल्या पत्रकार परिषदेतून समोर आणल्या आणि ही घटना हा घातपात असल्याचा आरोप केला आहे. व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांनी बारामती पोलिस ठाण्याबाहेर आंदोलनही केले होते. व्हीएसआर कंपनीबाबत अजित पवार यांचे पुत्र जय पवार हेदेखील आता आवाज उठवू लागले आहेत. अपघाताचा तपास सीआयडीकडे सोपविला आहे.

बारामतीतील विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू

28 जानेवारी 2026 रोजी सकाळी मुंबईवरून बारामतीकडे जाणाऱ्या विमानाचा बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाला, यावेळी मोठा स्फोट होऊन विमान जळून खाक झालं, यावेळी विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूर होता. विमानात अजित पवार (Ajit Pawar), सह-पायलट शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी असे एकूण पाच जण होते. बारामती विमानतळावर विमान उतरण्याच्या प्रयत्नादरम्यान सकाळी पावणे नऊच्या सुमारात विमानाचा भीषण अपघात झाला झाला. विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सुमित कपूर त्या दिवशी विमान उडवण्यासाठी मूळ नियोजित पायलट नव्हता तर मूळ पायलट साहिल मदान ट्रॅफिकमध्ये अडकल्याने काही तास आधी सुमित कपूरला कॉल आला आणि त्याने अजित पवारांचं (Ajit Pawar) विमान बारामतीला घेऊन जाण्याची जबाबदारी घेतली होती. (V K Singh)

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला, दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला : रोहित पवार
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला, दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला : रोहित पवार
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Embed widget